शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी गेली मुलगी; पुन्हा परतली नाही; विहिरीपशी गेली अन्…

भंडारा | भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एक घटना घडली आहे. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीवर काळाने घाला घातला आहे. शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी मुलीनं विहिरीजवळ धाव घेतली. शेळ्यांना पाणी पाजले. त्या मुलीचा पाय घसरला ती पाण्यात पडली. मुलगी येत नाही म्हणून आई विहिरीजवळ आली. अशावेळी मुलीच्या चप्पला दिसल्या. त्यावरून आईं हंबरडा फोडला. यासह गावातील लोकांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.
जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकत असलेली मुलगी शाळा करून शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी विहिरीकडे गेली. अशावेळी तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. तिचं नाव सलोनी नखाते असून ती 16 वर्षांची होती.
आई वडील ती परतली नसल्यानं तिला शोधायला आले. अशावेळी विहिरीत पहिलं तर ती दिसलीच नाही. विहिरीच्या बाहेर आईला तिची चप्पल दिसली. आईनं हंबरडा फोडला. अशावेळी वडील देखील तिथं आले. गावातील इतरही लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिले. गावातील लोकांनी पुन्हा तिच्या शोधासाठी शेताकडे धाव घेतली.
अड्याळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तिचा विहिरीत पडलेला मृतदेह बाहेर काढला. यामुळे आता गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या मुलीच्या जान्यान कुटुंबीयांवर काळाने घाला घातला आहे. चीचाळ येथे तिचं अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.