आई बाबाने निष्काळजी पना केला आणि ५ वर्षीय निष्पाप चिमुरड्याचा जीव गेला.

सातारा | कोणाचा काळ कधी येईल हे सांगता येत नाही. घरात जर लहान मुले असतील तर त्याच्यावर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे असते. अशीच एक दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यात घडली. घराच्या बांधकामासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत बुडून एका पाच वर्षाच्या चिमूरड्याचा मृत्यू झाला. ही घटना खंडाळा तालुक्यातील शिरवळ या गावी घडली. पार्थ प्रवीण चांगण मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव आहे. पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह त्याच्या पालकांच्या त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शिरवळ शहरात हळहळ व्यक्त होत होती.
नवीन घराचे बांधकाम चालू होते –
शिरवळ मधील चौपाळा या कॉलनीमध्ये प्रवीण चांगल हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. शेजारी सागर कोंडेकर यांच्या नवीन घराचे बांधकाम चालू होते. त्यामुळे सागर कोंडेकर यांनी बांधकामाकरिता पाण्याची टाकी बांधली होती. खेळता खेळता पार्थ हा पाण्याच्या टाकीत पडला. तेथे उपस्थित असणारे लोकांचे लक्षात ही गोष्ट आले. त्यांनी लगेच टाकीतून बाहेर काढले. ताबडतोब उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल.
पार्थला त्याच्या पालकांनी उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला होता. पार्थच्या मृत्यूमुळे चांगन कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला. शिरोळ मधील सरकारी हॉस्पिटलमध्ये पार्थ चे पोस्टमार्टम करण्यात आले. शिरवळ येथील पोलीस स्टेशन मध्ये प्रवीण चांगन यांनी तक्रार दिली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. करण लहान मुलांसोबत दुर्घटना घडण्याचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. गेले काही दिवसापूर्वीच नागपूरला देखील चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा चिमुकला खेळत असताना आपल्या घराच्या पाचव्या माळ्यावरून खाली पडून मृत्यू पावला. नागपूर जिल्ह्यातील कपिल नगर या ठिकाणच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडून आली.
याची मुलांनी पाचव्या माळ्यावर पडून सुद्धा जगण्यासाठी संघर्ष केला डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात डॉक्टरांनाही अपयश आल. शेख अफज असे याघटनेतील चिमुरड्याचे नाव आहे. नागपूर येथील शेख खोजा यांचा हा एकुलता एक मुलगा होता. हा चिमुरडा खेळत असताना घराच्या बाल्कनीत गेला. तिथे तो गजाला धरून उभा राहिला मात्र त्याचा तोल गेल्यानंतर थेट पाचव्या मजल्यावर खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा उपचार चालू असतानाच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात व्यक्त होत आहे.