तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” मालिका होणार बंद, कलाकार झालेत भावूक….

“तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” झी मराठी या वाहिनीवरील ही प्रसिद्ध मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेने गेले एक वर्ष रसिक प्रेक्षकांची सेवा केली. अशात एक वर्षा नंतर ही मालिका बंद होणार असल्याने चाहते थोडे नाराज आहेत.
या मालिकेने सुरुवातीपासून एकत्र कुटंबपद्धतीवर भाष्य केले. यामध्ये आतापर्यंत अनेक कलाकार येऊन गेले. मालिकेत जास्त पात्र असल्याने या मालिकेत सतत वेगवेगळे कलाकार ही पात्रे साकारताना दिसली. मात्र ही मालिका कधीच कंटाळवणी वाटली नाही.
मालिकेत सिद्धार्थ अप्पा देशमुखच्या भूमिकेत हार्दिक जोशी होता तर अमृता पवार आदिती मिलिंद करमरकर हे पात्र आदिती सिद्धार्थ देशमुखने साकारल. तात्याच्या भूमिकेत चारुदत्त कुलकर्णी होते, बायोबाईच्या भूमिकेत सुरेखा लहामगे-शर्मा असे अनेक कलाकार होते. यातील प्रत्येक कलाकाराने ही मालिका प्रसिद्ध होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
अशात आता ही मालिका बंद होणार असल्याने नुकतेच या मालिकेचे शेवटच्या भागाचे शुटींग पार पडताना दिसले. त्यामुळे यावेळी सर्व कलाकार मंडळी भावूक झाली होती. प्रत्येक जण एकमेकांना मीठ मारत होते. तसेच आपले आता पर्यंतचे सर्व सुंदर क्षण आठवत होते.
३० ऑगस्ट २०२१ पासून “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” ही मालिका सुरू झाली होती. अशात आता ही मालिका बंद होणार असल्याने या मालिकेच्या जागी प्रेक्षकांना “नवा गडी नवं राज्य” ही मालिका पाहता येणार आहे.