विशेष

आपल्या दोन मुलासह बायकोची हत्या करून तरुणाने आपलेही जीवन संपवले….कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल.

पुणे: अलीकडेच अपघाताची मालिका सुरू असतानाच पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील तरुणाने आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवून स्वतः देखील फाशी घेतली. फाशी घेतलेल्या तरुणाचे नाव अमित यादव हे आहे. या तरुणाने सुरुवातीला आपल्या मुलीला आणि मुलाला विष देऊन त्याची हत्या केली.

 

त्याची बायको टिना यादव हीची सुध्दा हत्या केली. या तिघांची हत्या केल्यानंतर या युवकाने स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली. एकाच वेळी चार मुडदे पडलेले पाहून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. अमितने लिहिलेल्या चीठीमध्ये कर्जाला कंटाळून अखेर चा निर्णय घेण्याचे ठरवले.

 

अमित यादव हा पुण्यामध्ये मंदाकिनी चौकीत राहत होता.त्याने आपल्यावरील असलेले कर्ज ,खाजगी सावकार त्याला पैसा साठी त्रास देत होते त्यामुळे त्याने त्याच्या कुटुंबाला संपवून स्वतः देखील फाशी घेतली. अमितला त्याच्या घरचे फोन लावत होते परंतु त्यांच्या फोन ला कसलाही रिस्पॉन्स मिळाला नाही.

 

त्यामुळे तेथेच राहणारे अमितच्या सासरकडील लोक त्यांना अमित बद्दल विचारणा केली. तसेच अमितच्या सासू आणि सासऱ्याने अमित ज्या भाड्याच्या खोलीत राहत होता तेथे जाऊन पाहणी केली असता, त्यांना खोलीचा दरवाजा बंद आढलला त्यांनी नंतर पोलिसांना बोलावून घराचं दार तोडले आणि घरात पाहिले तर घरात एक सोबत तीन मुडदे दिसले आणि अमित हा छताला लटकलेला दिसला.

 

अमित ची बायको आणि चिमुरडी दोन मुले बेडवर मृत अवस्थेत आणि अमित हा छताला लटकलेला पाहून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. केवळ कर्जामुळे आणि पैशाच्या अडचणीमुळे पूर्ण यादव कुटुंब उध्वस्त झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून घेतली .पुढील तपास हे पुण्याचे पोलीस करत आहे. अधिक माहिती ही पुढील तपास झाल्यानंतर देऊ असे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close