आई होण्यासाठी या अभिनेत्रीने घेतली ही ट्रीटमेंट, मात्र आई न होता तिला भोगाव्या लागतायत प्रचंड वेदना….

भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठने नुकताच तिच्या आयुष्यातील एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती एका विचित्र आजाराशी झुंज देत आहे. तिला संधिवात आहे त्यामुळे तिला हातापायांमध्ये जडपणा जाणवतो आहे. काही दिवसांपूर्वी तिचे पती अविनाश दुबे यांनी सांगितले की, लग्नाच्या सहा वर्षानंतरही ती आई होऊ शकली नाही. तिने IVF चाही प्रयत्न केला पण तोही फसला. तिचे स्वतःचे एक युट्यूब चॅनल देखील आहे. आता अभिनेत्रीने या चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या आयुष्यातील दुःख व्यक्त केले आहे.
संभावनाने सांगितले की, काही वर्षापूर्वी तिला संधिवाताचा त्रास होत होता आणि आता तिला पुन्हा हा त्रास होऊ लागला आहे. हा सगळा त्रास IVF नंतर सुरु झाल्याचे अभिनेत्रीने सांगितले. तिने सांगितले की, अशा स्थितीत तिचे हात-पाय ताठ होतात आणि जर ती जास्त वेळ थंडीत बसून राहिली तर तिचे हात जड पडतात किंवा सुजतात.
संभावना व्हिडिओमध्ये पुढे म्हणाली की, ती एक महिन्यापेक्षा जास्त काळ औषध घेत आहे. आयव्हीएफ आणि इतर समस्यांबद्दल बोलताना अभिनेत्री खूप भावूक झाली आणि ढसाढसा रडू लागली. तिला आयुष्यात असलेल्या या समस्येचा आता कंटाळा आला आहे. तसेच तिची सहनशक्ती संपली आहे. इतकंच नाही तर पती अविनाशलाही तिच्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं संभावना म्हणाली. तसेच एक गोष्ट ठीक होत नाही तोच तिच्या आयुष्यात आणखीन एक संकट उभे राहत आहे. आयुष्यात असलेल्या या बाबींमुळे ती नैराश्यात आहे.
संभावना आणि अविनाश या दोघांनी साल साल २०१६ मध्ये लग्न केले. त्यावेळी बाळाला जन्म देण्यासाठी अविनाश तयार नव्हता. मात्र आता त्याला देखील बाळ हवं आहे. नैसर्गिक रीत्या बाळ होतं नाही म्हणून संभावना IVF ची ट्रीटमेंट घेत होती. मात्र यात तिला असह्य वेदना होत आहेत. त्यामुळे ते दोघे अजून आई बाबा होऊ शकले नाहीत. आपल्या पत्नीला होत असलेल्या वेदना पाहून अविनाशला देखील दुःख होतं आहे.