मनोरंजन

बालवयात मुलाचा रोल साकारला म्हणून या सुंदर अभिनेत्रीवर केला होता लिंग बदलल्याचा आरोप…..

मुंबई | “कभी अलविदा ना कहना” या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. या चित्रपटात अर्जुन नावाचा एक बालकलाकार देखील होता. या बालकलाकाराचा क्युटनेस आणि त्याचा अभिनय पाहून सगळ्यांनीच त्याचे कौतुक केले. मात्र हा बालकलाकार एक मुलगा नसून एक मुलगी होती. एहसास चन्ना या अभिनेत्रीने बालवयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने अनेक चित्रपटांमध्ये मुलांच्या भूमिका साकारल्या.

 

तिने साकारलेल्या भूमिका पाहून ती एक मुलगी आहे असे कोणालाच वाटत नव्हते. आपल्या आयुष्यात अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने मुलांचे रोल साकारायला सुरुवात केली. मात्र यावेळी तिच्यावर अनेक विचित्र आरोप करण्यात आले. तिचे वडील एक निर्माते आहेत. तिची आई ही मालिका विश्वातील अभिनेत्री आहे. सुरुवातीला तर अशी बातमी समोर आली होती की, तिच्या वडिलांनी करण जोहरवर आपल्या मुलीला तिच्या वडिलांची परवानगी न घेता चित्रपटात काम करण्यास सांगितले. तसेच तिच्या वडिलांचे असे देखील म्हणणे होते की, एहसासच्या आईने तिला लहान वयातच पैसे कमावण्यास भाग पाडले.

 

ती लहान असताना तिच्या शिक्षणाकडे लक्ष न देता तिला अभिनयात काम करायला सांगितले. या अभिनेत्रीच्या आयुष्यामध्ये या सर्व चर्चा सुरू होत्या तितक्या तिच्यावर आणखीन एक विचित्र आरोप करण्यात आला. अगदी लहान वयातच तिने स्वतःचे लिंग बदलले आहे असे सर्वजण म्हणू लागले. यावरून या अभिनेत्री वर अनेक वेगवेगळे आरोप करण्यात आले. खूप लहान वयात तिला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. मात्र या सर्व परिस्थितीवर तिने मोठ्या हिमतीने मात केली. तसेच तिच्यावर टीका करणाऱ्यांकडे तिने दुर्लक्ष केले.

 

एहसासने तिच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, माझे आई-वडील माझ्या वरून नेहमी भांडत असत. तसेच खूप कमी वयात मला माझ्या लिंगावरून चिडवले जाऊ लागले. त्यामुळे मी अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला. मात्र आता मी पुन्हा एकदा जिद्दीने अभिनय क्षेत्रात काम करत आहे.” एहसासने वास्तुशास्त्र या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर आर्यन, माय फ्रेंड गणेशा, फूंक, बोंबई अशा अनेक चित्रपटांमध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली.

 

सध्या ती वेब सिरीज आणि युट्युब सिरीज मध्ये काम करत आहे. गर्ल्स हॉस्टेल या वेब सिरीजमध्ये तिने रिच आहे पात्र साकारले होते. या सिरीजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. त्यानंतर सर्वाधिक गाजलेल्या कोटा फॅक्टरी या सिरीजमध्ये देखील ती झळकली. तिने ट्रांसिस्टर या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत बालपणीच एवढे मोठे दुःख सहन केलेली ही अभिनेत्री आज पुन्हा एकदा हिमतीने अभिनय क्षेत्रात नाव कमवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close