मनोरंजन

महेश भट यांच्यामुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार होता मृत्यू…

मुंबई| बॉलीवूड हे एक असे क्षेत्र आहे जिथे दिवसेंदिवस नवनवीन कलाकार दाखल होत आहे. या स्पर्धेच्या जगात नवीन कलाकार आल्याने जुन्या कलाकारांसमोर मोठे आव्हान उभे राहते. त्यामुळे प्रत्येक कलाकार मोठ्या मेहनतीने लाईमलाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो.

 

बॉलीवूड कलाकार आणि मादकपणा तसेच व्यसने यांचे एक वेगळे त्रिकुट आहे. खूप कमी कलाकार आहेत ज्यांना कोणतेही व्यसन नाही. शंभरातील 90% कलाकार वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. आपल्या आयुष्यात असलेले नैराश्य दूर करण्यासाठी कलाकार नेहमीच दारू आणि इतर व्यसनांच्या आहारी जात असतात. मात्र यामुळे बऱ्याचशा कलाकारांना दुर्दैवी मरण देखील आले आहे.

 

आपल्या पोर्टलवर आतापर्यंत तुम्ही अशा पद्धतीने मृत्यू पावलेल्या अनेक कलाकारांच्या कहाण्या वाचल्या असतील. मात्र आज आपण दारूच्या याच भयानक व्यसनापासून दूर होऊन मरणाच्या दारातून परत आलेल्या अभिनेत्रीची कहाणी जाणून घेणार आहोत. तिची ही कहाणी बऱ्याच व्यक्तींसाठी प्रेरणादायी देखील ठरू शकते.

 

अभिनेत्री पूजा भट ही सर्वांनाच माहिती आहे. पूजाचे आयुष्य नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. डॅडी हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक तिचे वडील म्हणजे महेश भट होते. या पहिल्या चित्रपटात महेश भट यांनी तिला अतिशय बोल्ड आणि मादक अंदाज दाखवले.

 

आपल्या वडिलांबरोबर ती अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. महेश भट यांच्याबरोबर पूजा नेहमी लीप टू लीप किस सीन दिले होते. त्यामुळे तिच्यावर आणि महेश भट यांच्यावर जहरी टीका देखील झाली होती. मात्र यावेळी महेश भट यांनी हे फक्त एका मॅक्झिनसाठी चित्रित केलेले आहे. मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो. असे सांगत याचे स्पष्टीकरण दिले होते.

 

पूजा भट वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच दारूच्या आहारी गेली होती. तिच्या आयुष्यामध्ये खूप नैराश्य होते. तिचे वडील महेश भट यांनी त्यांची पहिली पत्नी आणि पूजाची आई किरण भट यांच्याबरोबर घटस्फोट घेतला होता. त्याचबरोबर करिअरच्या प्रगतीपथावर असताना तिच्या बॉयफ्रेंडचे देखील निधन झाले. त्यामुळे ती आणखीनच खचून गेली. त्यामुळेच तिला दारूचे फार व्यसन लागले.

 

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती फक्त दारू पीत होते. खूप कमी वयात तिने दारू प्यायला सुरुवात केल्यामुळे तिला वेगवेगळे आजार जळू लागले. वयाच्या 24 व्या वर्षी तिला हे लक्षात आले की, आपण जर आता दारू सोडली नाही तर आपण खूप कमी दिवस जगू. त्यामुळे तिने मन घट्ट करून दारू सोडण्याचा निश्चय घेतला. साल 2016 मध्ये तिने दारू न पिण्याची शपथ घेतली. यावेळी तिच्या वडिलांनी तिची खूप साथ दिली.

 

तिच्या वडिलांनी तिला खूप समजावले. तसेच तिच्या आयुष्यातील नैराश्य दूर करण्यास देखील मदत केली. त्यामुळे पूजा हळूहळू स्थिरावली. त्यानंतर तिच्या आयुष्यातील निराशा देखील दूर होऊ लागली, आणि आता ती एक सुदृढ आयुष्य जगत आहे. यासाठी ती नेहमीच आपल्या वडिलांचे आभार मानते.

 

पूजाच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलायचे झाल्यास डॅडी या चित्रपटानंतर तिने दिल है कि मानता नही या चित्रपटामध्ये देखील दमदार अभिनय केला. त्यानंतर तिने सडक, प्रेम दिवाने, जनम, पहला नशा, बॉयफ्रेंड, चाहत, तमन्ना, कभी ना कभी, जख्म, एव्हरीबडी से आय एम फाईन अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close