मनोरंजन

शाळेच्या गणवेशात दिसत असलेली ही चिमुकली सध्या आहे नॅशनल क्रश, ओळखा पाहू

रश्मिका मंदाना ही अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. साउथ इंडस्ट्री प्रमाणेच लवकरच ती आपल्याला बॉलीवूड गाजवताना देखील दिसणार आहे. पुष्पा या चित्रपटाला मिळालेल्या अभुत्वपूर्व यशानंतर अभिनेत्रीच्या प्रसिद्धीत कमालीची वाढ झाली आहे. तिच्या चाहता वर्ग देखील प्रचंड वाढला आहे.

 

तिच्या सहज सुंदर अभिनयाने आणि तिच्या सुंदरतेमुळे ती नॅशनल क्रश बनली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टीची चाहत्यांना सांगत असते. अशाच तिचे काही लहानपणीचे फोटो तुफान वायरल होत आहेत. तिचे सुंदर फोटो पाहून सर्वजण तिचं कौतुक करत आहेत.

 

अभिनेत्रीने साल 2019 मध्ये स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बालपणीचे फोटो शेअर केले होते. यातील एका फोटोमध्ये ती शाळेच्या गणवेशात दोन वेण्या घालून दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये ती गुलाबाच्या फुलांजवळ उभी आहे आणि सुंदर अशी स्माईल देत आहे. तसेच तिचा आणखीन एक फोटो पाहून ती लहानपणापासूनच ग्लॅमरस होती असं म्हणायला हरकत नाही. कारण या फोटोमध्ये ती एका हिल स्टेशनवर आहे. आणि तिथे तिने अगदी एका मोठ्या अभिनेत्री प्रमाणे केस मोकळे सोडून तिने पोज दिली आहे. तिचे हे सर्व फोटो पाहून चाहते तिला वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

अभिनेत्रीने हे फोटो शेअर करून बरेच दिवस झाले आहेत. मात्र तिचे हे फोटो आता पुन्हा एकदा व्हायरल व्हायला लागलेत. नुकताच तिचा पुष्प हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये तिने अल्लू अर्जुन बरोबर स्क्रीन शेअर केली. यातील तिच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक झाले. आतापर्यंत तिने रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले होते. पुष्पा हा चित्रपट थोडासा वेगळा अँगल मधला होता. तसेच तिचे पात्र देखील थोडे वेगळे होते. मात्र तिने आपल्या पात्राला पूर्णपणे न्याय दिला आहे. या चित्रपटातील श्रीवल्ली हे पात्र तिने खूप छान साकारले. त्यामुळे सगळीकडे तिच्या नावाचा आणि अभिनयाचा बोलबाला झाला. तसेच आता पुन्हा एकदा तिचे बालपणीचे फोटो देखील चर्चेत आले आहेत.

 

रश्मिकाचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी एका कोडावा कुटुंबात सुमन आणि मदन मंदान्ना यांच्याकडे कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील विराजपेट येथे झाला. तिने एमएस रामय्या कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पदवीचे शिक्षण घेतले. 2016 मध्ये आलेला किरिक पार्टी या चित्रपटातील पहिल्यांदा झळकली. त्यानंतर तिने चलो, गीता गोविंदम, प्रिय कॉर्मेड या चित्रपटांमध्ये अभिनय केला. तिचे हे सर्व चित्रपट खूप हिट ठरले. लवकरच ती मिशन मजनू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close