.रेखा यांच्या बरोबर फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याने गाजवलं आहे बॉलीवूड, ओळखा पाहू हा आहे तरी कोण?….

आपल्या डोळ्यांनी आणि सुंदरतेचे दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी सगळ्यांच्या मनावर राज्य केले. त्यांचा अभिनय नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे. आजवर त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला आपल्या अभिनयाने यशाच्या एका मोठ्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे. अशात रेखा सध्या वेगवेगळ्या रियालिटी शोमध्ये दिसतात. त्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या फोटोत त्यांच्या मांडीवर एक छोटा मुलगा बसलेला दिसत आहे.
आता हा मुलगा नेमका कोण आहे याच उत्तर अनेक जण शोधत आहेत. तुम्ही फोटो पाहिल्यावर जर तुमच्याही लक्षात आलं नसेल किंवा तुम्हाला या मुलाची ओळख पटली नसेल तर एक हिंट देतो. हा मुलगा आता खूप मोठा झाला आहे आणि तो देखील नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आहे. एवढी ओळख सांगून देखील तुम्हाला हा मुलगा नेमका कोण आहे हे समजलं नसेल तर पुढील बातमी वाचा.
रेखा यांच्या मांडीवर बसलेला हा चिमुकला मोहबते या चित्रपटातील जुगल हंसराज आहे. तो जुगल ज्याच्या निळ्या डोळ्यांवर लाखो तरुणी फिदा झाल्या होत्या. मोहबते या चित्रपटात त्याने दमदार अभिनय केला. त्याच्या क्युटनेसमुळे सगळे जण त्याला चॉकलेट बॉय म्हणत होते.
अशात या जुगलने लहानपणापासून अभिनयाला सुरुवात केली आहे. मासूम आणि कर्मा हे त्याचे पहिले चित्रपट होते.
त्याने अनेक चित्रपटांमध्ये बाल कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत. लहानपणी देखील तो कमालीचा गोड दिसत होता. आता तो अभिनयापासून दूर गेला आहे. त्याने बॉलीवूडमधून काढता पाय घेतला आहे.
बरेच दिवस तो जास्मिन ढिल्लनला डेट करत होता. नंतर या दोघांनी साल २०१४ मध्ये लग्न केले. आता तो आपल्या पत्नी बरोबर अमेरिकेत राहतो. इथेच त्याने आपला संसार थाटला आहे. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. जुगल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगतो.