विशेष

तीन वर्षीय मुलाचा धक्कादायक मृत्यू; कारण जाणून धक्काच बसेल

देहरादून | देहरादूनमध्ये काळीज हेलावणारी घटना घडली आहे. बागेश्वर येथील कपकोटमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. एका तीन वर्षीय मुलाला घरातील अंगणासमोर खेळताना मुंग्या चावल्या असल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे त्याच्या मोठ्या भावाला देखील मुंग्या चावल्या पण त्याची प्रकृती आता बरी असल्याचं समजतंय. पौसारी गावात गुरुवारी ही घटना घडल्याचं समोर आलंय.

 

पौसारी गावातील भूपेश राम यांना दोन मुलं होती. ही मुलं घराच्या अंगणासमोर खेळत होती. तीन वर्षाच्या मुलाचं नाव सागर आहे. तर पाच वर्षाच्या मुलाचं नाव प्रियांशू आहे. या दोघांनाही मुंग्या चावल्या.

 

त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशावेळी तीन वर्षीय सागरला रुग्णालयात दाखल करण्यावेळी मृत्यू झाला आणि त्याला मृत घोषित केलं. तसेच पाच वर्षीय प्रियांशुवर उपचार सुरू होते. त्याला कुटूंबीय घरी घेऊन आले.

 

गुरुवारी कुटूंबीय त्यांना रुग्णालयात घेऊन आले. अशावेळी डॉक्टरांना दुखापत झालेल्या मुलांच्या वडिलांनी मुलांना मुंग्या चावल्याच सांगितलं जातंय. प्रियांशु वाचला परंतु तीन वर्षीय सागरला आणण्यास उशीर केल्याचं उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मिश्रा यांनी सांगितलं होत.

 

तीन वर्षाच्या सागरचा मृत्यू झाल्यान मोठ्या प्रमाणावर गावावर शोककळा पसरली होती. लाल मुंग्या या विषारी असतात. यामुळे यावर तातडीने उपचार करावे अन्यथा विषारी मुंग्यांमुळे जीव जाण्याची चिन्हे दिसून येतात. या मुंग्यांना रेड फायर मुंग्या, तसेच बुलेट मुंग्या म्हटलं जातं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close