मनोरंजन

हिंदी चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली! राजू श्रीवास्तव नंतर प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

जिममध्ये व्यायाम करताना आला हार्ट अटॅक

मुंबई | नुकत्याच राजू श्रीवास्तव यांच्या जाण्यान पोकळी निर्माण झाली होती. यातच आत्ता नवीन धक्का बसला आहे. काही दिवसांपासून बॉलिवूडला धक्क्यावर धक्के बसत आहेत अशाच एका धक्का बॉलीवूडला पुन्हा बसला आहे. आर्थिक कष्ट आणि आर्थिक परिस्थिती हलकीची असतानी सगळ्यांवर मात करत बॉलीवूड वर आपलं नाव कोरलं होतं.

 

राजू श्रीवास्तव आणि दिपेश भान यांच्या नंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्याला जिम मध्ये वयायम करत असताना हार्ट अटॅक आला आहे. त्यामुळे सदर अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनेत्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ते अत्यंत प्रसिध्द अभिनेते म्हणून देखील ओळखले जायचे. मात्र अचानक त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

 

कुसुम’, ‘वारीस’ आणि ‘सूर्यपुत्र करण’ या सारख्या प्रसिध्द मालिकांमध्ये काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलेले अभिनेते सिद्धांत विर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ते जिम मध्ये व्यायाम करत होते. त्यानंतर अचानक ते खाली पडले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी देखील ते वाचले नाहीत. राजू श्रीवास्तव आणि दिपेश भान यांना देखील हृदयविकाराचां झटका आला होता. त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली होती. मात्र त्यानंतर पुन्हा या घटनेनं पूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close