मनोरंजन

Shooking!  दक्षिण चित्रपट सृष्टीवर शोककळा, एका दिवसात 2 कलाकारांचा मृत्यु झाला होता एक ज्युनिअर एनटीआरचा खास

बेंगळूर |गेले दोन वर्षाचा काळ  चित्रपट सृष्टी साठी खुप दुःखदायक ठरला आहे. चित्रपसृष्टीतील अश्या दिग्गज कलाकारांचे निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. एक झाले की एक मराठी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी मधील दिग्गज कलाकार मंडळी आपण गमावत आहोत. या धक्क्यामुळे चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सध्या दक्षिण चित्रपट सृष्टीवर सोन्याचे दिवस आले आहेत असा म्हंटला तर काय वावग ठरणार नाही. सध्या त्याचे चित्रपट चांगलेच चर्चेत आहेत व प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. KGF चित्रपटानी चांगली कामगिरी बजावली.

पण अश्या आनंदाच्या क्षणी दुधात विरजण पडल्या सारखे दिग्गज कलाकार मंडळीच्या निधन वार्ता ऐकून हळ हळ व्यक्त केली जात आहे.   दक्षिण चित्रपट सृष्टी मधील दिग्गज कलाकार नेदूमुदी वेनु यांचा लिव्हर कॅन्सर या आजाराने निधन झाले. त्यानी ५०० हून अधिक साऊथ आणि मल्याळ सिनेमात काम केले होते.या मुळे दक्षिण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली असतानाच अजून एका दिग्गज कलाकाराचे निधन झाल्याचे वृत्त आहे.

तेलगू चित्रपट चे प्रसिध्द दिग्दर्शक म्हणून ओळख असणारे महेश कोनेरू यांच्या निधन झाले. च्यांचे हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. महेश कोणेरू हे तेलगू चित्रपट सृष्टी मधील प्रसिध्द दिग्दर्शक होते. त्यानी आणेक सुपर हिट सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये सुभांकु नमस्कारम, पोलीसवरी हीचारिका, 118  या सारखे सुपर स्पेशालिटी चित्रपट तेलगू चित्रपट सृष्टीला दिले. विशेष म्हणजे त्यांनी 40व्या वर्षीच्या आत या जगाचा निरोप घेतला.

महेश हे ज्युनिअर NTR च्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे म्हणजेच भावा प्रमाणे होते. महेशच्या जाण्याच्या बातमीने ज्युनिअरला खूपचं मोठा धक्का बसला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर भाऊक पोस्ट शेअर केली.माझा जवळचा मित्र व साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिध्द दिग्दर्शक महेश कोनेरु यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.देव त्यांच्या कुठुंबला दुःख पचविण्याची ताकत देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. दिग्दर्शक सुरेंदर रेड्डीने ही शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close