दुःखद : विठुरायाच्या पंढरपुरात धक्कादायक प्रकार, महिला स्वच्छतागृहात 9वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह.

पंढरपूर: दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी यामुळे परिसरातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपुरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. पंढरपूर येथील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहात एका नववर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे पंढरपुरात भीतीचे वातावरण पसरले आहे.महिलांचे हे स्वच्छतागृह काही दिवसापासून बंद होते. या मृत बालकाच्या शरीरावरील काही भाग गायब असल्याने हा कोण आहे का वेगळेच काही याची शंका परिसरातून लोकांमधून होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर परिसरात भीती चे वातावरण पसरले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर येथील संतपीठ मधील जगदंब वसाहती येथे राहणारे तिमा पांडुरंग धोत्रे याचा नववर्षाचा मुलगा नातेवाईकांकडे जातो म्हणून नातेवाईकांच्या घरी गेला होता. कृष्णा धोत्रे हा नातेवाईकांच्या घरातून जेवण करून बाहेर पडला. परंतु रविवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्या घरी ही तो परतला नाही. त्यामुळे त्याचा शोधाशोध सर्वत्र चालू झाली. तीमा धोत्रे हे कृष्णाचा शोध घेत असताना घराशेजारील असलेल्या महिलांच्या बंद शौचालयात काही दिसले. नीट पहिल्या नंतर तेव्हा त्यांना पहाटेच्या वेळी कृष्णाचा मृतदेह बाथरूम मध्ये दिसून आला.
तीम धोत्रे हे बाथरूम मध्ये जवळ गेले असता त्यांना कृष्णाचा मृतदेह दिसला. कृष्णाच्या शरीरावरील बराचसा भाग गायब झालेला होता. तिमा धोत्रे यांनी ही माहिती लगेच पंढरपूर पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळतात पोलिसांचे पथक त्या ठिकाणी हजर झाले. पोलीस अधिकारी विक्रम कदम, अरुण फुगे, सी व्ही केंद्रे, कपिल सोनकांबळे, आकाश भिंगार देवी, प्रशांत बडे, दादा माने, सचिन माने, शरद कदम, सुनील बनसोडे, हे घटनास्थळी उपस्थित होते.
या परिसरात मोठ्या प्रमाणात डुकरे आणि भटके कुत्रे फिरताना दिसून येतात. या जनावरांनी कृष्णाला जखमी करून खाल्ले आहे का? असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत आहे. परंतु चिमुरड्या कृष्णाला डुकरांनी जखमी केली नसून त्याचा घात पात असावा अशी तेथील नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. चिमुरड्याच्या मृतदेहाबद्दल पोलिसांनी सखोल चौकशी करावी तसेच या खुनाचा तपास लावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
या मृत्यू झाल्याबद्दल पोलिसांनी तपासणीला सुरुवात केली आहे. तेथील परिसरात सीसीटीव्ही च्या फुटेज मिळत आहे का? याची चौकशी करत आहेत. सापडलेला मृत्यूदेहामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना आपल्या लहान मुलांना घराबाहेर पडू न देण्याचे सूचना दिली आहेत. त्याचप्रमाणे पालकांना आपल्या मुलांची काळजी घेण्यास सांगितले आहे.