दुःखद : गाढ झोपेत असलेल्या हुशार सिध्दीला गमवावा लागला जीव, दुपारची झोप ही तिची शेवटची झोप ठरली.

रत्नागिरी : अनेक वेळा आपण साप चावून मृत्यू झाल्याची घटना पाहिल्या आहेत. परंतु आपले मन हेलावणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. गाढ झोपेत असलेली सिध्दी ही झोपेतच असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील घोणसरे याठिकाणी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिध्दी हीचा मृत्यू सर्पदंशाने आहे आहे. सिध्दी ही अकरावी मध्ये शिकत होती. ती दुपारच्या वेळी गाढ झोपेत होती. एका उंदराचा पाठलाग करत एक साप तिच्या खोलीत शिरला होता. सिध्दी चव्हाण हिला दोन ते तीन वेळा त्या सापाने चावा घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी घडल्याची स्थानिक सूत्रांनी दिली आहे.
ही घटना घडल्यानंतर सिध्दी चव्हाण हिला उपचार करण्यासाठी जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले . परंतु सिद्दीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात उशीर झाला होता. हॉस्पिटल ला पोहोचण्यापूर्वीच सिद्दीचा मृत्यू झाला होता. दुपारच्या वेळी झोप घेत असलेली सिध्दी हिला माहित सुद्धा नव्हते की तिच्यासाठी झोप ही आजची शेवटची झोप असेल.
या घटनेमुळे सिध्दी चव्हाण चव्हाण च्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. आपल्या डोळ्यादेखत मुलीचा जीव तडफडत असल्याने सिध्दी चे आई आणि वडील मोठ्याने आक्रोश करू लागले. शिक्षणात हुशार असलेल्या सिद्दीच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे. पा