दुर्दैवी: पेन्सिलने घेतला चिमुरडीचा जीव. ६ वर्षीय आर्तीकाचा झाला तरफडून मृत्यू

लखनऊ : आपण काही बऱ्याच वेळा लहान मुलांचा अपघाताने किंवा काही दुर्घटना होऊन मृत्यू झाल्याचे पाहतो. लहान मुलांना विशेष लक्ष देणे गरजेचे असते. तस पाहिलं तर या घटना अजाणतेपणे घडून येतात. उत्तरप्रदेश मध्ये अशीच एक दुर्घटना झाली आहे. एका लहान मुलीचं पेन्सिलने मृत्यू झाला आहे. या लहान चिमुरडीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लहान मुले त्यांना दिलेली साधने व्यवस्थित वापरत नाहीत, आपन याकडे लक्ष द्यावे. लहान मुलांना धोका तर नाही ते तापासून पहावे. मिळालेल्या माहितीनुसार पहाडी वीर येथे राहणारे नंदकिशोर यांनी सांगितले की अभिषेक,अंकिता आणि आर्तीक हे घरामध्ये अभ्यास करत बसले होते. अभ्यास करत असताना पेन्सिल तोंडात धरून टोक करत होते.
टोक करताना पेन्सिलची साल श्वास नलिकेत अडकून श्वास बंद पडला. ती खाली पडून तडतडू लागली. तिला तीव्र वेदना होत होत्या. ती आक्रोश करत होती तिला घरच्यांनी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले परंतु तिला हॉस्पिटल मध्ये पोहोचण्यापूर्वी मृत घोषित केले. या संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबातील लोकांनी तिची चिरफाड करण्यास नकार दिला होता. डॉक्टरांनी सांगितले की अशा घटना रोखण्यासाठी लहान मुलांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.
उत्तरप्रदेशमधील हमिपुर जिल्ह्यात ही दुर्घटना झाली आहे. या घटनेमुळे सर्वानाच धक्का बसला आहे. लाकडाच्या पेन्सिल ला टोक करत असताना साल श्वसन नलिकेत अडकून चिमुरडीचा तडफडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे लहान मुलांकडे व्यवस्थिक लक्ष देणे गरजेचे आहे.असे आव्हान करण्यात आले आहे.