दुःखद: धुळे जिल्ह्यात १० वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याचा खेळताना झाला मृत्यू , नागरिक संतापले व्हिडिओ व्हायरल.

धुळे : एका चिमुकल्या मुलाचा विजेच्या खांबाला हात लागून मृत्यु झाला .ही घटना धुळे जिल्ह्यात अतिशय धक्कादायक पद्धतीने घडली आहे . चिमुकला मुलगा खेळत असताना त्याचा हात विजेच्या खांबाला लागला. त्या खांबामधून विजेचा प्रवाह चालू होता. अचानक वीज आल्याने त्या मुलाला विजेचा झटका बसला. आणि या झटक्या मध्ये त्याचा मृत्यू झाला.या घटनेचा व्हिडिओ रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो व्हिडिओ काही वेळात व्हायरल झाला.
नेमकी घटना काय आहे. ..
धुळे शहरात एका दहा वर्षाच्या मुलाचा विजेच्या खांबाला हात लागल्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव अर्शद अहमद आपशक असे आहे. विजेच्या खांब मधून करंट आल्याने आणि त्या चिमुरड्याचा खांबाला हता लागल्याने त्याचा त्याच वेळी मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली.
पाहा व्हिडिओ –
धुळे हादरलं! खेळताना दहा वर्षाच्या मुलाने विजेच्या खांबाला धरलं अन् क्षणभरात गेला जीव, VIDEO pic.twitter.com/gbNu6q3uIM
— News18Lokmat (@News18lokmat) January 19, 2023
स्थानिकांनी संताप केला व्यक्त..
या घटनेमुळे तेथील नागरिक संतापले आहेत. त्यांनी विद्युत महा पारेषण अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. वेळोवेळी या खांबाची दुरुस्ती करण्याची त्यांनी सूचना ,अर्ज देखील केले होतो. म्हा वितरण कंपनीने त्याच वेळी हे दुरुस्त केले असते तर आज हा चिमुरडा वाचला असता. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.