दुःखद : आईवडिलांच्या डोळ्यासमोरून काही क्षण दूर झालेला चिमुकला कायमचाच दूर झाला,घटनेने सारा परिसर हादरला

संभाजीनगर: भरभर अंगणात खेळत असताना एका तीन वर्षाच्या चिमुरड्याचा विजेच्या खांब्याला हात लागून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील फतेमा नगर या ठिकाणी घडले आहे. शेख नाजिम शेख वसीम हे या दुर्घटनेत मृत पावलेल्या बालकांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाजिन चे वडील हे औरंगाबाद मधील ट्रॅक्टरच्या कंपनीत कामाला आहेत. तर आई ही गृहिणीच आहे. 26 जानेवारी च्या दिवशी नाजीम हा घरासमोर असणाऱ्या अंगणात खेळत होता. तर त्याचे आईवडील हे घरात बसले होते. खेळत असताना नजिम चा हात अंगणातील विजेच्या खांबाला लागला. त्या विजेच्या खांबातून वीज प्रवाह चालू होता.विजेचा जोराचा धक्का बसल्याने नाजिम्म जागेवरच निपचीप पडला.नजिम्म जमिनीवर पडल्याचा शेजाऱ्यांनी पाहिलं. त्यामुळे त्यांनी आरडा ओरड सुरू केली.
बाहेरील गोंधळ ऐकून नजीम चे आईवडील घराबाहेर आले. त्यांनी नाजिम् ला बेशुद्ध झालेले पाहिले.लगेच नजिम् ला त्याच्या आई – वडिलांनी दवाखान्यात घेऊन गेले. परंतु दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी चिमुकल्याला तपासले असता मृत झाल्याचे समजले. आईवडिलांच्या डोळ्यासमोरून काही क्षण चिमुकला दूर झालेला तो कायमचाच दूर झाला. या घटनेमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला.तसेच चिमुकल्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.