दुःखद: आई वडिलांच्या भांडणात निष्पाप चिमुरड्याचा गेला जीव..

Beed crime news : बायकोबरोबर भांडण झाल्यावर एका युवकाने स्वतःच्याच मुलाला तीन मजली इमारती वरून फेकून दिले. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. घत एमध्ये चिमुरडा हा जागीच मरण पावला.
मिळालेल्या माहितीनुसार बीड मध्ये या झालेल्या घटनेत २ वर्षाचा मुलगा जागीच मरण पावला. मुलाला खाली फेकून दिल्या नंतर स्वतः वडिलांनी देखील उडी मारली त्यामध्ये वडील जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मानसिंग हा गेल्या काही दिवसापासून भांडण झाल्यामुळे त्याची बायको आणि दोन मुले याच्यातून वेगळे राहत होता. मानसिंग ची बायको पूजा ही आपल्या आजीकडे मुलांसोबत राहत होती.
काल रात्रीच्या वेळी मानसिंग हा मुलांना भेटायच्या निमित्ताने पूजाच्या घरी आला होता. त्यावेळी पूजा आणि मानसिंग या दोघांमध्ये जोराचे भांडण झाले. या भांडणामध्ये मानसिंग ने आपल्या दोन वर्षाच्या चिमुरड्याला तीन मजली इमारती वरून खाली फेकून दिले. २१ फूट खाली आदळल्यामुळे चिमुरड्यांचा जीव गेला. त्यानंतर स्वतः मानसिंग ने उडी मारली त्यामुळे तोही जखमी झाला.
मानसिंग ला दवाखान्यात उपचार चालू आहे मात्र चिमुरड्यांचा जीव गेला. मानसिंग हा दारू पिऊन आला होता असे पूजा ने सांगितले. त्याच बरोबर घटना स्थली पोलीस पथक जावून त्यांनी मानसिंग विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे चिमुरड्या साठी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तर मानसिंग ने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.