दुःखद: अगोदर आई वडील आणि नंतर चिमुरड्यांचा ही झाला मृत्यू, रायगड मधील हसत खेळत संपूर्ण कुटुंबच झाले उध्वस्त.

रायगड : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र रस्ते अपघात चे प्रमाण वाढले आहे. आजची पहाट ही पंडित कुटुंबासाठी अतिशय दुःखाची ठरली आहे. मुंबई गोवा या रस्त्यावर बस आणि कार या दोघांमध्ये झालेल्या अपघातात कारमधील १० जणांचा मृत्यू झाल्याची घटना झाली आहे. या कार मध्ये प्रवास करत असलेले १० जनापैकी हे ९ जण जागीच ठार झाले होते तर एक मूल जखमी होता. त्या लहान मुलाचं ही काही वेळाने निधन झाले. या झालेल्या दुर्घटनेमध्ये हेदवी सावंतवाडी तसेच डावखोत या ठिकाणचे नागरिक मरण पावले. तसेच यात पंडित हे कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. हे पंडित कुटुंब डावकोत आणि मुंबई या ठी ठिकाणी राहत होते.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे हे निलेश पंडित, मुद्रा पंडित, भव्य पंडित आणि नंदिनी पंडित असे आहे. या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पंडित कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या पंडित कुटुंबासोबत जाधव कुटुंब हे त्यांच्या नातेवाईकांच्या वर्षश्रध घालण्यासाठी गुहागर या गावी निघाले होते.
हे दोन्ही कुटुंबे इको गाडी नं MH 48BT8673 या गाडीतून एकूण दहा लोक प्रवास करत होते. मुंबई गोवा या रस्त्यावर रेपोली गावशेजारी ट्रक आणि यांची गाडी या दोघांची धडक बसली. या घडलेल्या दुर्घटनेत पंडित घराण्यातील 3 जण त्याच ठिकाणी ठार झाले. तर त्यांच्या लहान मुलगा जखमी झाला होता. परंतु त्याचे ही प्राण नंतर गेले.
पंडित कुटुंब हे मूळ डावखोत या ठिकाणचे परंतु ते कामानिमित्त मुंबई मध्ये राहत होते. निलेश पंडित त्याची बायको नदिनी पंडित आणि मुलगी मुद्रा पंडित हे तिघे जागीच ठार झाले तर मुलगा भव्य पंडित हा जखमी झाला. नंतर त्याचाही मृत्यू झाला. या अपघातामध्ये अख्खे पंडित कुटुंब संपून गेले. या घटनेची माहिती मिळताच poliabtya ठिकाणी आले . त्यांनी अपघाताची नोंद केली. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.