विशेष

दुःखद, शेवटच्या श्वासा पर्यंत छोटी चिमुकली आईच्या गळ्याला पकडून बसली.मन सुन्न करणारी घटना वाचुन डोळयात पाणी येईल.

नागपूर : नागपूर मध्ये एक मनाला चटका देणारी घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या छोट्याशा मुलीला घेऊन आत्महत्या केली आहे. या मुलीने आपल्या तीन वर्षाच्या छोट्या मुलीला घेऊन अंबारी सरोवरत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यावेळेस मायलेकींची मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आल तेव्हा चिमुकली ही आईला चिकटलेली होती. मायलेकींचे मृतदेह एक सोबत पाहून बघणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.

मिळालेल्या माहितीनुसार एका 28 वर्षाच्या विवाहतेने तीन वर्षाच्या मुलीला घेऊन नागपूर येथील अंबाझरी तलाव मध्ये आत्महत्या केली आहे. कल्पना पंडागळे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तलाव वरती उभी असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना ही माहिती दिली.

पोलिसांना माहिती मिळतात पोलीस हे त्या तलावावरती पोहोचले. पोलिसांनी तलावा मधील दोन्ही मृतदेह बाहेर काढले. महिलेचा आणि मुलीचा दोघींचे मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले. घरात होणाऱ्या वादामुळे या महिलेने आत्महत्या केली असल्याचे सर्वप्रथम सगळ्यांना वाटले. तलावामधून मृतदेह बाहेर काढत असतानाच चिमुकल्या मुलीचा हा मृतदेह तिच्या आईला चिकटलेला होता. चिकटलेला लहानशा मुलीचा मृतदेह पाहून बघणारे माणसांच्या डोळ्यात पाणी आले.

कल्पना पंडागळे हिने आपल्या नवऱ्याला मेसेज केला होता की तुला एक चांगली गुड न्यूज देणार आहे. तुला पोरगी शेवटची पहायची असेल तर सांग. असं त्या मेसेज मध्ये लिहिलेलं होतं. त्यानंतर ती महिला सोमवारी रात्रीच्या वेळी अंबाझरी या तलावा वर आली. तिने आपल्या तीन वर्षाच्या लहान मुलीला खाऊ घातले. त्यानंतर कल्पना ने आपल्या मुलीला कडेवर घेतले आणि पाण्यात उडी मारली.

या तलावावरती तपास करत असताना पोलिसांना एक चिठ्ठीमिळाली आहे. एचडी मध्ये कल्पना चा आई-वडील भाऊ तसेच कल्पनेचा पती यांचे नंबर लिहिलेले आहेत. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर ती पुढील माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close