कृषी अपडेट

Tur bajarbhav update : तुरीला यंदा दर किती मिळेल;जाणून घेण्यासाठी सविस्तर माहिती वाचा

tur bajarbhav update : नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या दोन तीन महिन्यात जास्त पावसाने शेतकऱ्यांची पिके गेली. उरली सुरली पिके त्यातून काही पिकांना मनासारखा भाव मिळाला नाही. खरीप पेरणीही लांबणीवर गेली त्यामुळे काही ठिकाणी तुरीची पेरणी झाली नाही.(tur bajarbhav update

ज्या ठिकाणी पेरणी झाली त्यात काही पिके रोगाने गेली.त्यामुळे या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे या वर्षी तुरीला चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Tur rate today in maharashtra 202)

 

तरीही देशात तुरीचे भाव हे चालू काळात फारसे वाढलेले दिसत नाहीत.तरीही सरकारने दिलेल्या हमी भावापेक्षा जास्त आहेत. केंद्र सरकारने या वर्षी सहा हजार सहाशे रुपये हमी भाव दिलेला आहे.तर बाजारात तुरीला भाव हा ६६०० ते ७३०० रू आहे. गेल्या काही दिवसापासून बाजारात तूर येऊ लागली आहे. (Tur Bajarbhav)

 

त्या तुरीला ६५०० ते ७५०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. परंतु बाहेरील देशातून तूर आयात केली जात असल्याने तुरीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.(tur bajarbhav update 2022)
तसेच देशातील ही नवीन पीक बाजारात येत असल्याने तुरीचे दर कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक देशात सर्वात जास्त तूर उत्पादन घेतले जाते. बाजारात ही तूर येणे चालू झाले आहे. तुरीमधे थोडाफार ओलावा जाणवत असल्याने तुरीला दर हा ६४०० रू देण्यात आला.

 

यावरही देशातील तुरीचे उत्पन्न कमी असल्याने आयात मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. त्यातच शेतकऱ्यांकडून सरकार तूर खरेदी करणार असल्याने तुरीला ७ तर ८ हजार रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे असे बाजार भाव अभ्यासकांनी म्हंटले आहे.(tur bajarbhav update)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *