स्वतः मधला दोष सांगत तुषार कपूरने जाहीर केले लग्न न करण्याचे कारण…. ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

मुंबई| अनेक व्यक्ती लग्न म्हणजे जीवनात मिळवलेल खर यश अस समजतात. कारण आई वडीलानंतर आपल्या आयुष्यात आपली आयुष्यभर साथ देणारा एक साथीदार प्रत्येकाला हवा असतो. त्यामुळेच या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती लग्न करतो. पूर्वीच्या काळी लग्न परंपरा व्यवस्थित टिकत होत्या. महिलांवर अन्याय झाले तरीदेखील महिला आवाज उठवू शकत नव्हत्या. मग अगदी पुरुषांवर देखील काही अन्याय झाला असल्यास तो पुरुष देखील झाकली मूठ सव्वा लाखाची असं म्हणत पुढे चालत होता. मात्र आता लग्नाच्या या सर्व परिभाषा बदलल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती आता एकटे आणि स्वतंत्र राहणे अधिक पसंत करतो. त्यामुळेच अनेक व्यक्ती अविवाहित राहण्याचा निर्णय घेतात. त्यातीलच एक बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर आणि त्याची बहीण एकता कपूर.
बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने नुकतीच बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण केली आहेत. तुषारने 2001 मध्ये करीना कपूरसोबत सतीश कौशिक दिग्दर्शित ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तुषारचे अजून लग्न झालेले नाही आणि त्याचा इरादाही नाही. आपला ५ वर्षांचा मुलगा लक्ष्य याला सिंगल पॅरेंट झाल्यामुळे अभिनेता खूप खूश आहे आणि त्याच्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप त्याला आवडत नाही.
तुषार हा एक सिंगल पेरेंट म्हणून जगतो आहे. त्याने आपल्या सर्व आयुष्य आपल्या मुलाच्या अवतीभवती जगण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न केल्यावरच व्यक्ती सुखी संसार करू शकतो हे त्याला मान्य नाही. लग्नाशिवाय देखील बऱ्याच व्यक्ती सुखी आयुष्य जगू शकतात असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळेच सरोगसीच्या माध्यमातून त्याने एका मुलाला जन्म दिला. तुषारशी बॉलीवूड कारकीर्द तितकीशी भन्नाट म्हणता येणार नाही. त्याच्या पहिल्या चित्रपटानंतर बॉलीवूड वर तो काही खास कमाल करू शकला नाही. मात्र मोठ्या काळानंतर गोलमाल या चित्रपटांमध्ये त्याने मूक अभिनय केला. या अभिनयाने त्याने सर्वांच्या मनामध्ये राज्य केलं. गोलमाल चित्रपटाच्या प्रत्येक भागात हा अवलिया आपल्याला दिसतो. त्याच्या अभिनयाने त्याने अनेकांना खळखळून हसवलं. पहिला चित्रपटानंतर गोलमाल या चित्रपटामध्ये त्याचं विशेष कौतुक पाहायला मिळाले.
बॉलीवूडमध्ये काम करत असताना तुषारच्या अफेअरची कधीच चर्चा झाली नाही. तो कुणाच्या प्रेमात आहे किंवा तो कुणाला डेट करत आहे अशी कोणतीच बातमी माध्यमांवर पाहायला मिळाली नाही. कारण त्याला नेहमीच सिंगल राहणं पसंत होतं. मात्र तो अजूनही लग्न का करत नाहीये असे प्रश्न त्याचे राहताना नेहमीच त्रास होत असतात. अनेक जण त्याला याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारतात. अशात एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या लग्नाच्या निर्णयावरती मत व्यक्त केलं. त्याचं हे मत ऐकून अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखती ते त्यांनी म्हटलं की, ” मला माझा आयुष्य दुसऱ्याबरोबर शेअर करायला आवडत नाही. मी एक स्वतंत्र पालक आहे. एका बाळाला सांभाळणं म्हणजे फक्त त्याचे डायपर बदलणं असं नसतं. त्या बाळाची पूर्ण काळजी घेणे त्याला काय हवं काय नको ते सर्व पाहणे, त्याच्या प्रत्येक सुखदुःखात त्याच्याबरोबर राहणे, त्याच्यावर चांगले संस्कार करणे म्हणजे एका बाळाचे संगोपन करणे होय. या सर्व गोष्टी करण्यासाठी लग्न केलेच पाहिजे अशी कोणतीही अट नाही. मी एकटा देखील माझ्या बाळाला खूप छान पद्धतीने संस्कार देऊ शकतो आणि त्याला सुदृढ आयुष्य देखील देऊ शकतो. त्यामुळेच मी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.”
तुषार कपूर ची बहिण एकता कपूर ही देखील एक प्रसिद्ध निर्माते आहे. आजवर तिने अनेक मालिकांचे चित्रीकरण केले आहे. एकता कपूर ने देखील भावाप्रमाणे सिंगल आई होण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे विचार देखील तुषार बरोबर अगदी तंतोतंत जुळतात. ती देखील सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे.