दोन मुलं झाली पोरकी ! पोलीस उपनिरीक्षकाचे 31व्या वर्षी अचानक निधन; परिसर हळहळला

पुणे | पिंपरी चिंचवड मधील पोलीस उपनिरीक्षक पतंगे साहेब यांचे दुःखद निधन झाले आहे. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास दुःखद घटना घडली.
नंदकिशोर पतंगे अशे या पोलीस अधिकारी यांचं नाव आहे. त्यांचा मूळ गाव बारामती. त्यांच्या पाठीमागे आई दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे पतंगे हे 115 बॅचचे अधिकारी होते. पतंगे 2018 साली पोलीस दलात सामील झाले होते.
ते कर्तव्य बजावत असतात आदर्श पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे पोलीस दलात काम केले त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कामाचा ठसा असा होता की आसपासचा परिसर त्यांचं नाव ऐकलं की घाबरायचा. हजार जबाबी पणा आहे त्यांचां स्वभाव.
सोमवारी संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना जवळचे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते त्या उपचारादरम्यान त्यांचं दुःखद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार व डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. ही बाब समोर आली आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. ईश्वर तिच्या घरच्यांना कुटुंबीयांना यातून सावरण्याची मदत करो.