दुर्दैवी : संक्रांतीच्या मुहूर्तावर घडला दुःखद प्रकार, बापाच्या डोळ्यादेखत सोडला चिमुकल्यानी जीव.नागपुरातील घटना.

नागपूर: संक्रातीच्या सणात बरेच जण पतंग उडवत होते. परंतु याच पतंगाच्या धाग्याने एका चिमुरड्यांचा जीव गेल्याची घटना नागपुरात घडली आहे. शाळा सुटल्यानंतर आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना ११वर्ष वयाच्या वेदांतच्या गळ्याला पतंगीचा दोर आवळून गळा चिरला गेला. त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले परंतु उपचार चालू असतानाच त्याचा जीव गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव वेद कृष्णा शाहू असे आहे. या मुलाचे मांज्याच्या दोराने गळा चिरला गेला. वेद हा जरिफटका या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयात पाचवीला शिकत आहे. वेद ला श्री नावाचा एक मोठा भाऊ आहे. त्याच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ हे चौघे जण राहत होते. वेळच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. शनिवारी वेद चे वडील कृष्णा हे वेदला शाळेतून घरी घेऊन येत असताना ही दुर्घटना घडली. वेदला ॲक्टिवा गाडीच्या समोर उभे केले होते.
गाडीवरून घरी जात असताना वेदच्या गळ्याला मांज्याचा दोरा अडकला आणि त्यातच त्याचा गला चिरला गेला. त्याच्या मनेतून रक्त येऊ लागले सुरुवातीला वेद च्या वडिलांनी त्याला खाजगी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. तेथेही त्याला घेण्यात आले नाही. वेदची श्वास नलिका आणि रक्त नलिका कापली गेली होती. त्यामुळे धतोलीच्या डॉक्टरांनी त्याची सर्जरी देखील केली. परंतु मृत्यू शी झुंज देत असताना रविवारी वेद चे निधन झाले.
वेदच्या या अचानक जाण्यामुळे आईला आणि वडिलांना धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी बऱ्याच ठिकाणी पतंग उडविण्याच्या नादात अपघात झाले आहेत . कोणी बिल्डिंग वरून खाली पडले. तर कोणी मांज्याच्य दोराने कापले गेले. तर कोणी पतंग आणण्यासाठी रेल्वे रुल ओलांडताना रेल्वेखाली गेले.