दुर्दैवी! दोन दिवसावर साखरपुडा, लग्नाची तयारी असतानाच पोलीस तरूनी सोबत घडली दुर्दैवी घटना.

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेली तरुणी लग्नाची तयारी करत असतानाच झाली दुर्घटना झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसानंतर साखरपुडा असल्यामुळे तयारी करण्यासाठी तरुणी आपल्या भावासोबत दुचाकीवर तालुक्याच्या ठिकाणी गेली होती.खरेदी करून परत येताना समोरून येणाऱ्या दुचाकीने कट मारल्यामुळे तरुणी आणि तिचा भाऊ खाली पडला त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने दोघांनाही चिरडले यातच जागीच तरुणी ठार झाली.
मिळालेल्या महितीनुसार भंडारा जिल्यातील तुमसुर तालुक्यात देव्हडि या ठिकाणी रेल्वे पुलावर घटना घडली. किरण सुखदेव आगाशे असे मृत मुलीचे नाव आहे. तर लोकेश सुखदेव आगाशे हे तिच्या भावाचे नाव आहे. किरण ही मुंबई ला सीआरपीएफ मध्ये नोकरी करत होते.तिचे लग्न ठरल्याने ती गावी आली होती. त्यामुळे ती खरेदी करण्यासाठी भावासोबत तालुक्याच्या ठिकाणी बॅग खरेदी करायला गेली होती.
खरेदी करून परत येत असतानाच समोरील दुचाकीने त्याच्या दुचाकीला कट मारला . कट मारल्यामुळे किरण व तिचा भाऊ रस्त्यावर पडले गेले. पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने त्या दोघांना त्याच वेळी चिरडून टाकले किरण ही जागीच ठार झाली तर किरण चां भाऊ गंभीर जखमी झाला.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्याच्या अपघाताची माहिती होताच तिच्या आई वडिलांनी एकच आक्रोश करायला सुरुवात केली.घरात आनंदाचे वातावरण होते ते एका क्षणात नष्ट झालं. किरणच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला. परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.