मनोरंजन

दुर्दैवी! तुझ्यात जीव रंगला मालिकेतली आणखीन एका अभिनेत्रीचे निधन; हॉटेल बंद केलं अन्

कोल्हापूर | मराठी मालिकाविश्वात अत्यंत दुःखद घटना घडताना दिसत आहेत. यातच आता कलाकारांच्या दुखत आणखीन भर पडताना दिसत आहे. आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर छाप पाडत ती अभिनेत्री सोडून गेली आहे.

 

या अभिनेत्रींन आपल्या साईड रोलच काम केलं असल तरीही ते अगदी चोखपणे बजावले आहे. काही दिवसांपूर्वी हिंदीतील दिग्गज देखील आपल्याला सोडून गेल्याचं समजतंय. यामुळे चित्रपटसृष्टी हळहळली आहे.

 

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे हलोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने हॉटेल सुरू केलं होतं. हॉटेल बंद करून जात असताना तिला डंपरने जोरदार धडक दिली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

 

या महामार्गाची अवस्था अगदीच खराब झाली आहे. कोल्हापूर सांगली महामार्गावरील रस्त्याची चाळण झाल्याच दिसतंय. याआधी देखील बरेचसे अपघात झाल्याचे समजतय.

 

या महामार्गालगतच ‘प्रेमाची भाकरी’ हे हॉटेल अभिनेत्री कल्याणीने उभ केलं होत. अशावेळी ती बाहेर येताच वाहनाने धडक दिल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. कल्याणीन मराठी मालिका सृष्टीत चांगली कामगिरी केली. तिनं तुझ्यात जीव रंगला या मालिकेप्रमाणेच इतरही मालिकेत काम केलं आहे.

 

आपल्या अभिनयाचा दर्जा तिनं दाखवला आहे. आता कल्याणीच्या अपघाती निधनानं मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close