दुर्दैवी : विश्वासानी गळा कापला, नवऱ्यासोबत फिरायला गेली पण जिवंत परतलीच नाही.

Jalna crime news: गेल्या काही दिवसापासून जालना शहरात अपघाताचे सत्र चालू असतानाच नवीन वर्षाच्या तोंडाला एक दुदैवी बातमी समोर आली आहे. जालना शहरात एका युवकाने आपल्याच बायकोला मारल्याची घटना घडली आहे. या घडलेल्या प्रकरणात मयत तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. (Jalna crime news)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कविता सखले ही महिला या अपघातामध्ये मरण पावली.या कवितेचे वय हे २९ वर्ष होते. तिचा पती गजानन आव्हाड याला पोलिसांनी अटक केलेले आहे. गजानन आव्हाड हा औरंगाबाद मधील महावितरण कंपनीत शिपाई म्हणून काम करत होता. तर सिललोड मध्ये कविता तहसील कार्यालयात कोत्वलाचे काम पाहत होती. गेल्या एक वर्षापूर्वी कविता आणि गजानन यांचा विवाह झाला होता. गजानन चे हे तिसरे लग्न होते. तरीही त्यांच्या दोघांचा संसार सुखात चालू होता. एक वर्षभर दोघेही चांगले राहिले ,नंतर गजनाने घराचे काम काढल्याने कविताला माहेरून सारखे पैसे घेऊन ये म्हणून तगादा लावत होता.
बऱ्याच वेळा कविताला पैशासाठी मारहाण देखील केली होती. यामुळे कविताने गजानन च्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु नातेवाईकांनी समजाऊन सांगून दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र केले होते. त्याच बरोबर गाजाजन आणि कविता या दोघांना एकत्रित देखील रहायला सांगितले होते.
गजानन आणि कवितांचे भांडण मिटल्यावर ते दोघेही हसनाबाद येथे राहण्यास आले. गजानन च्या मनातील राग अजून उतरलेला नव्हता, पोलिसात केलेली तक्रार ही त्याला सतावत होती त्यामुळे त्यानं कविताला बाहेर फिरायला जायचं असं सांगून दुचाकीवर बसवून घेऊन गेले . रात्री ९ ते १० च्या सुमारास कूंभरी या गावाजवळ दोघेही आले होते. त्यांच्या गाडीला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. त्यामध्ये कविता ही ट्रॅक्टरच्या खाली चिरडली गेली. कविताच्या जागीच जीव गेला होता परंतु गजानन ला कोठेही खरचटले नव्हते.
गजानन ला खरचटले सुद्धा नाही ,हे पाहून कविताच्या भावाने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आणि पोलिसात तशी फिर्याद देखील दिली. या अपघातात गजानन हा कसलाच जखमी झाला नाही तसेच त्याला कोठेही खरच्टल नाही यामुळे बाकी लोकांचा आणि पोलिसाचा संशय वाढला. तसेच अपघात झालेला ट्रॅक्टर हा गजानन आव्हाड यांच्या पाहुण्यांचा होता ,त्यामुळे पोलिसांनी गजानन आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर ला ताब्यात घेतले. आणि दोघांनाही अटक केली.
त्याच बरोबर कविताची सासू ,सासरे हे सुद्धा माहेरून पैसे आन म्हणून छळ करत होते. या सासरच्या मंडळींना मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास दिल्यामुळे सर्वांना पोलिसांनी अटक केली. या घटनेचा पुढील तपास हा भोकद्रन पोलिसांनी चालूच ठेवला आहे. तपास पूर्ण झाल्यावर अधिक माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले.