इतर

दुर्दैवी! गाडीवर लिहिले होते ‘शेवटी नशीब’; बहिणीला भेटायला नेघालेल्या भावाचा रस्त्यातच….

बीड | नशिबा पुढे कोणाचे काहीच चालत नाही. नशिबामध्ये जर मृत्यू लिहिला असेल तर तो त्यावेळी आणि त्याच ठिकाणी घडतो. या घटनेला कोणीच थांबवू शकत नाही. नियतीच्या मनात जे असते ते कधी ना कधी घडतेच. अशात बीडमध्ये भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागी चिरडून मृत्यू झाला आहे.

 

घरामध्ये लग्नसराई सुरू असताना सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. लग्नामध्ये प्रत्येक व्यक्ती हा खुश असतो. आत्या, मामा, मावशी या सर्वांनाच आनंद झालेला असतो. मात्र बीड मधील एका कुटुंबामध्ये लग्नाची तयारी सुरू असताना एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

 

या व्यक्तीचा जीव लग्नासाठीचे कार्य करत असतानाच गेला आहे. लग्नाचा आहेर घेऊन जात असताना त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यामुळे आहेर घरी न पोहोचता त्यांचे शव घरी पोहचले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. तसेच ऐन लग्नाच्या तोंडावर ही घटना घडल्याने कुटुंबातील सर्वच जण रडत आहेत.

 

बीड – पाटोदा- मांजरसुंबा महामार्गावरील ससेवाडी फाट्यावर हा भीषण अपघात झाला. आपल्या भाच्याचे लग्न ठरल्याने मामा आपल्या बहिणीला आहेर घेऊन जात असताना त्यांच्या दुचाकी गाडीला समोरून एका कंटेनरने धडक दिली. यात गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला असून मामाचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

मुकींदा पवार (३०) रा. हिंगणी हवेली, ता. बीड असे मृत मामाचे नाव आहे. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ते घरून एमएच ४२ एडी. ९६६५ ही गाडी घेऊन बाहेर पडले. बीड येथे बहिणीच्या घरी जात असताना ससेवाडी फाट्यावर एमएच ४६ बी. ४६८ या कंटेनरची त्यांच्या गाडीला जोरात धडक लागली.

 

ही घटना लिंबागणेश चौकी व महामार्ग केंद्र मांजरसुंबा येथील पोलिस स्टेशन हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  मामाच्या निधनामुळे भाचा देखील आता खूप दुःखी आहे. उद्या म्हणजे 16 ऑगस्ट रोजी त्याचे लग्न ठरलेले आहे. कंटेनरचा वाहन चालक हा फरार असून पोलिसांनी त्याच्या क्लीनरला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. मुकिंदा पवार यांचा जिथे अपघात झाला त्याच महामार्गावर सकाळच्या सुमारास कार टेम्पोचा अपघात होऊन त्यात सहा जणांचा बळी गेला होता.

 

मुकिंदा पवार हे ज्या दुचाकीने प्रवास करत होते त्या दुचाकी वरती मागच्या बाजूला शेवटी नशीब…. असे लिहिले होते. त्यांच्या दुचाकी वरचा हा संदेश अनेकांच्या काळजाला चटका लावणारा ठरला आहे. तसेच नशिबापुढे कुणाचे काहीच चालत नाही असे अनेक जण म्हणत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close