दुर्दैवी : चिमुरडी दगावली, आईने फोडला हमबर्डा ‘पोरी ऐवजी मला का नेले नाही रे देवा…’

कोल्हापूर : गेल्या काही दिवसात दुर्घटना या जास्त प्रमाणात होताना दिसत आहेत. त्यातच मायलेकी दोघींना सापाने दंश केला.यात चिमुरडी दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना करवीर तालुक्यातील भामटे गावात घडून आली.पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षाच्या मुलीचा यात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये मयत मुलीचे नाव ज्ञानेश्वरी सचिन यादव हे आहे.
बुधवारी रात्री जेवण करून सगळे कुटुंब झोपले होते. मध्यरात्री ज्ञानेश्वरी ला सापाने चावले.त्याच बरोबर तिची आई जागी झाली असता तिलाही सापाने दंश केला. साप चावला हे समजताच ज्ञानेश्वरी आणि तिची आई दोघी नाही लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले. परंतु उपचार चालू असतानाच मुलीचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वरीचा मृत्यू झालेला पाहून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे यादव घराणे भामटे गावात देसाई नगर मध्ये राहत होते. रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपले होते. रात्री १ वाजताच्या सुमारास साप यांच्या घरात घुसला.
ज्ञानेश्वरीचा हात सापवर पडताच सापाने ज्ञानेश्वरीच्या हाताला चावा घेतला. ज्ञानेश्वरी झोपेत असल्यामुळे तिला काहीच समजले नाही. नंतर पुन्हा एकदा पाठीत साप तिच्या चावला. नंतर ज्ञानेश्वरी ने आईला जागे केले.आई जागी झाली असता साप तिलाही चावला. साप चावलेल्या दोघींनाही लगेच कोल्हापूरच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले.
मुलगी ज्ञानेश्वरी आणि आई नीलम या दोघी वर हॉस्पिटल मध्ये उपचार चालू होते. उपचार चालू असतानाच मुलीने जीव सोडला. आई नीलम हिच्यावर उपचार चालू असून तिची प्रकृती आता जराशी बरी आहे. डोळ्या देखत आईने आपल्या मुलीला साप चावलेला पहिला होता. आईच्या डोळ्या समोर मुलीचा जीव गेला. त्यामुळे आई ने टाहो फोडला हे देवा पोरी ऐवजी मला का घेऊन गेला नाही रे . या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.