दुर्दैवी : एक दिवसाच्या अंतराने मायलेकिचा झाला करुण अंत.

Yavatmal crime: यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यामध्ये हिवरा परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या ठिकाणी मुलीच्या मृत्यू नंतर दुसऱ्याच दिवशी आईनेही जीव सोडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हिवरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिवरा गावात राहत असलेले समाधान शिंदे आणि मीनाताई शिंदे यांचा सुखी संसार चालला होता. त्यांना अपूर्वा नावाची एक मुलगी होती. अपूर्वा ही ९ वर्षाची चिमुरडी होती. ५ तारखेला अपूर्वाच छोट्याशा आजाराने निधन झाले होते. मुलीच्या मृत्युच्या धक्क्याने मीनाताई अस्वाथ झाली होती.
मीनाताई हा धक्का सहन झाला नाही. मुलीच्या वियोगानी मीनाताई सुद्धा ७ तारखेला मरण पावल्या. फक्त एक दिवसाच्या अंतराने शिंदे कुटुंबातील दोन व्यक्ती गेले होते. त्यामुळे शिंदे कुटुंबाला धक्का बसला होता. शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला होता.
मीनाताई या हिवरा ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहेत. मीनाताईना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मीनाताई आणि त्यांची मुलगी अपूर्वा या दोघींनाही किडनीचे त्रास होते .या आजारामुळे त्या दोघींना आपला जीव गमवावा लागला. एक दिवसाच्या अंतरावर मायलेकी गेल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.