दुर्दैवी: लहान भावाची हत्या करून मोठा भाऊ झोपला शेजारीच, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

परभणी (parbhni crime news ): छोट्याशा कारणावरून झालेला वाद हा एका हत्त्ये पर्यंत येऊन ठेपल्याची घटना परभणी मध्ये घडली. मोठ्या भावाने लहान भावाचा काचेच्या ग्लास ने गळा चिरून हत्या केली आणि तो शेजारीच झोपला. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर खुनाची कबुली दिली आहे. एका छोट्याशा कारणामुळे एका भावाला आपला जीव गमवावा लागला. (parbhni crime news )
मिळालेल्या माहितीनुसार,परभणी शहरात साई कॉर्नर मराठवाडा प्लॉट या ठिकाणी ही घटना घडली आहे . अनेक दिवसानंतर दोन भाऊ एकत्र आले होते. परंतु ते दोघे एकत्र आल्याबरोबर त्या दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. आणि या शुल्लक वादा मधूनच हत्या झाल्याचे समोर आले आहे.
या हत्या नंतर मोठा भाऊ हा शेजारीच झोपला. सतीश कोंडीबा वाघमारे असे हत्या झालेल्या भावाचे नाव आहे तर सुनील कोंडीबा वाघमारे हे आरोपी भावाचे नाव आहे. ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी त्या जागेची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना सतीश हा कॉट खाली पडलेला दिसला तर सुनील हा कॉट वरती झोपला होता. पोलिसांनी सुनील वाघमारे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तू इथे का आला असे त्याला विचारण्यात आले तर त्याने सांगितले.
आई आजारी आहे त्यामुळे तिला दवाखान्यात उपचार करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे सुनील हे घरी आले होते. रात्री झोपताना सतीशने मला तोंडावर मारले आणि तू इथे का आला असे विचारले आणि पाय धरून पलंगावरून खाली पाडले. याचा राग आल्याने सुनील ने सतीश वर काचेच्या ग्लास ने वार केले. याची कबुली सुनील ने पोलिसांना दिली. (parbhni crime news )
या प्रकरणाची माहिती रामचंद्र वाघमारे यांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिस घटना झालेल्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. (parbhni crime news )