ती UPSC परीक्षेत पास झाली, तिचा सर्वत्र सत्कारही झाला, मात्र नंतर असं काही समजलं ज्यामुळे

ती UPSC परीक्षेत पास झाली, तिचा सर्वत्र सत्कारही झाला, मात्र नंतर असं काही समजलं ज्यामुळे आई वडिलांची सगळीकडे नाचक्की झाली
दिल्ली | UPSC परीक्षेचा निकाल लागून आता काही दिवस उलटून गेले आहे. अशात या परीक्षेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवला त्या सर्वांचेच कौतुक झाले. अनेक ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार समारंभ देखील पार पडला.
अशात आता यातील एखाद्या विद्यार्थ्याला सर्व हार तुरे घेतल्या नंतर समजले की, मी तर नापास झालो आहे तर, त्यावर शरमेने मान खाली करण्याची वेळ येईल. तर आता असाच काहीसा प्रकार बारामतीच्या दिव्या पांडे बरोबर घडला आहे.
दिव्या ही चित्तरपुर गावच्या रजराप्प कॉलिनी येथे राहते. UPSC परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या परीक्षेत तिचा ३२३ वा क्रमांक आला. त्यामुळे ती खूप खुश होती. तिच्या अनेक मित्रांनी नातेवाईकांनी सर्वांनीच तिला खूप शुभेच्छा दिल्या.
तिच्या परिसरात देखील ही बातमी खूप वेगाने पसरली. परिसरातील अनेक राजकीय पुढाऱ्यांनी देखील तिचा शाल तुरे देत सन्मान केला. आपल्या मुलीचं यश पाहून तिच्या आई वडिलांची मान देखील अभिमानाने उंचावली.
तिचे वडील CCL मध्ये क्रेन चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये देखील त्यांचे अभिनंदन केले गेले. वडीलांचा देखील सत्कार करण्यात आला. बघताबघता दिव्याच्या घरासमोर
अभिनंदन करणाऱ्यांची रांगच लागली.
आता सर्व हार तुरे घेतल्या नंतर बातम्यांमध्ये आपलं वृत्त छापून आल्यानंतर दिव्याला समजले की, ती अनुत्तीर्ण झाली आहे. खरंतर दिव्या पांडे नाही तर तामिळनाडूची दिव्या पी ३२३ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाल्याचं समजलं. आता पास झाल्याची बातमी जशी वाऱ्याच्या वेगाने पसरली तशीच नापास झाल्याची बातमी देखील सर्वत्र पसरली.
या सर्व गोंधळच कारण म्हणजे एक सारखं असलेलं नाव आहे. जेव्हा दिव्या पांडे निकाल पाहात होती तेव्हा नेमक इंटरनेट चालत नव्हतं. त्यामुळे तिच्या मित्रांनी निकाल पाहिला त्यावेळी त्यांना ३२३ या क्रमांकावर दिव्या पी हे नाव दिसलं. त्यांना वाटलं की ही आपलीच मैत्रीण आहे. त्यांनी लगेचच आपल्या मैत्रिणीला फोन करून शुभेच्छा दिल्या. दिव्याने देखील नंतर निकाल पहिला नाही. आपण पास झालोय या आनंदाच्या भरात ती याची शहानिशा करणे विसरून गेली.
अशात आता हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर दिव्या आणि तिचे कुटुंबीय फार नाराज आहेत. तसेच त्याच्या परिसरात आणि समाजात त्यांची नाचक्की झाली आहे. दिव्याच्या आई वडिलांनी या सर्व प्रकारा बाबद सर्वांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.खरं तर या मध्ये कुणाचीही काही चूक नाहीये. एक सारख्या नावामुळे हा गोंधळ झाला आहे. त्यामुळे दिव्या पांडेने आता हार न मानता पुन्हा एकदा कंबर कसून अभ्यास केला पाहिजे.