UPSC परीक्षेत शेवटच्या अंकाने केला घोळ, सत्य समोर येताच विद्यार्थ्याला आला हृदयविकाराचा झटका

UPSC परीक्षेचा निकाल ३० मे रोजी लागला. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. भरपूर मेहनत करतात. यात अनेकांना जश मिळत. मात्र काही विद्यार्थि या मध्ये अपयशी देखील होतात.
जे विद्यार्थी नापास होतात ते पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाला लागतात. मात्र बुलंद शहराचे रहिवासी असलेले उत्तम भारद्वाज यांना हे दुःख पचवता आलं नाही. आणि त्यांच्यबरोबर मोठा अनर्थ घडला आहे.
उत्तम भारद्वाज हे परराष्ट्र मंत्रालय सहाय्यक अधिकारी आहेत. ते पहिल्यांदाच MPSC च्या परीक्षेला बसले होते. निकाल लागला तेव्हा ते यामध्ये १२१ रँकने उत्तीर्ण झाले आहेत असं त्यांना समजलं. आपण पास झालो या आनंदात त्यांनी त्यांच्या संपूर्ण गावाला मिठाई वाटली.
आई वडील आणि कुटुंबातील अन्य व्यक्तींनी त्यांचं मोठं अभिनंदन केलं. सर्वत्र त्याच्या विजयाचा गाजावाजा झाला. ते देखील खूप आनंदी होती. त्यांच्या घरी शुभेच्छांसाठी मोठी गर्दी जमा झाली. ते १२१ व्या रँकने उत्तीर्ण झाले आहेत. हे देखील त्यांनी सर्वांना सांगितले.
मात्र त्यांचा हा आनंद अवघे २४ तास देखील टिकू शकला नाही. कारण सारख्याच क्रमांकावर आणखीन दोन व्यक्ती विजयी झाल्याची बातमी त्यांच्या पर्यंत पोहचली. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा स्वतः चा क्रमांक चेक करुन पाहिला. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले होते.
त्याचं झालं असं सुरुवातीला त्यांनी जेव्हा त्यांचा नंबर तपासला तेव्हा त्यांनी चुकीचा नंबर पाहिला होता. तिथे उत्तम भारद्वाज हे नाव तर होतं मात्र ते सोनीपत येथील उत्तम भारद्वाजच नाव होतं. सारख्या नावाने हा घोळ झाला.
सोनीपत येथील उत्तमचा क्रमांक 3516894 असा होता. तर बुलंद येथील उत्तम यांचा क्रमांक 3516891 हा होता. त्यांनी चुकून शेवटचा 1 तपासला नाही. त्यामुळे त्यांना वाटले की, तेच ही परीक्षा पास झाले आहेत. सत्य समोर आल्या नंतर त्यांना या गोष्टीचा खूप त्रास झाला. त्यात त्यांना एक हृदयविकाराचा झटका देखील आला.
कारण ते पास झाले आहेत ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. मित्र, कुटुंबीय या सर्वांना हे समजले होते. अशात आता हे सर्व खोटं आहे. आणि आता लोक आपल्याला काय बोलतील या विचाराने ते खूप खचून गेले.