इतर

अपयशी होऊनही मानली नाही हार, UPSC मध्ये लातूरच्या शुभम भोसलेची गगन भरारी

लातूर | काल (30 मे) रोजी UPSC परीक्षेचा निकाल लागला. निकाल लागताच समजले की, यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. अशात लातूरच्या शुभमनं देखील UPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे.

त्याच्या यशामुळे आज लातूरमध्ये आनंदाचे वारे वाहू लागलेत. UPSC परीक्षेचा हा त्याचा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आलं होतं.

मात्र त्यावेळी खचून न जाता अपयश हीच यशाची पहिली पायरी असल्याचं मानत त्याने पुन्हा एकदा अभ्यासाला कंबर कसून सुरुवात केली. आणि यावेळी त्याने यशाची मोठी झेप घेतलीच.

*कोण आहे शुभम भोसले?*

शुभम हा मूळचा लातूर शहराचा. त्याचं शालेय शिक्षण औसा येथील श्री मुखतेश्वर विद्यालयात येथे पूर्ण झालं. त्यानंतर महाविदयालयीन शिक्षणासाठी त्याने लातूरच्या दयानंद महाविद्यालयात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. त्याचे वडील संजय भोसले औसा येथे शिक्षक आहेत.

लहानणापासूनच शुभमला अधिकरी व्हायचं होतं. आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत त्यानं दिल्ली हे शहर गाठलं. इथे त्याने सलग दोन वर्षे मोठ्या मेहनतीने UPSC परीक्षेचा अभ्यास केला. आणि परीक्षेत मोठे यश मिळवून आपल्या गावच्या आणि कुटुंबियांच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.

परीक्षेत एकदा अपयश आले म्हणून तो मागे हटला नाही. उलट पुन्हा एकदा त्याने जास्त मेहनत घेऊन UPSC मध्ये त्यानं १४९ वा क्रमांक पटकवला.

काल लागलेल्या निकालात मुलींनी पहिली बाजी मारली असून यामध्ये श्रुती शर्मा ही आपल्या देशातून पहिली आली आहे. तर, अंकिता अग्रवाल दुसरा आणि गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच ऐश्वर्या वर्माने चौथा क्रमांक मिळवला आहे.

एवढेच नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रियवंदा म्हाडळकरनं तेराव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. आणि शुभम १४९ वा क्रमांक पटकावला आहे. अशात आपल्या मुलाच्या मेहनतीचे चीज झालेले पाहून त्याच्या कुटुंबीयांचे डोळे पाण्याने डबडबले. आता लवकरच शुभमच अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close