इतर

उलटी आली गाडी थांबवा’ नवं विवाहित नवरीचा सासरी जात असताना हृदयद्रावक अंत; वाचून डोळ्यात पाणी येईल

नवी मुंबई | लग्नासाठी वधू आणि वर दोघेही उत्सुक असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नामध्ये वेगवेगळी स्वप्ने पाहत असतो. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. यावेळी आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न झाल्यास त्या वधूला होणारा आनंद खूप जास्त असतो. मात्र या सर्व आनंदावर पाणी फिरवत एका वधूने मोठे पाऊल उचलले आहे.

 

राजस्थान मधील सवयी मधोपूर येथे काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली आहे. दीपक माळी नामक व्यक्ती वरात घेऊन आपल्या नवरीच्या घरी गेला होता. दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न लागले. आलेले सर्व वऱ्हाडी जेवले आणि वधू-वराला आशीर्वाद देऊन आपल्या घरी निघाले.

 

यावेळी वर देखील वधूला घेऊन डीजेच्या तालावर नाचत आपल्या घरी निघाला. वधू आणि वर ज्या गाडीत बसले होते त्या गाडीमध्ये वराकडची काही मंडळी होती. यामध्ये वधूची सासू देखील होती. गाडी थोड्या अंतरावर पुढे गेली.

 

अचानक वधूला चक्कर आली. त्यानंतर तिला उलटी देखील येऊ लागली. प्रवासाची सवय नसल्याने तिला असे होत असेल असे तिच्या पतीला आणि सासूला वाटले. मात्र यात काही वेगळीच भानगड होती. थोड्यावेळाने वधूने गाडी थांबवायला सांगितली. ती म्हणाली की, मला उलटी येत आहे त्यामुळे गाडी बाजूला घ्या. ड्रायव्हरने लगेच गाडी बाजूला थांबवली.

 

यावेळी वधू गाडीतून खाली उतरली. गाडीबरोबर चंबळ नदीच्या पुलावर थांबली होती. सदर वधू नदीच्या पुलाजवळ जाऊन उभी राहिली. उलटी करत आहे असे भासवत ती नंतर पुलाच्या रेलिंगवर चढली. तिला कोणी काही विचारणार तोपर्यंत तिने पाण्यात उडी घेतली. हे पाहून तिचा पती आणि सासरची मंडळी हवालदील झाले.

 

त्यांनी लगेचच तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. तसेच पोलिसांना देखील कळवले. पोलिसांनी आता या वधूचा शोध घेण्याचे कार्य सुरू केलेले आहे. हा शोध गेल्या बारा तासापासून सुरू आहे. मात्र अजूनही वधूचा काहीच पत्ता लागलेला नाही.

 

या घटनेविषयी ज्यावेळी वधूच्या वडिलांना विचारण्यात आले त्यावेळी ते म्हणाले की, माझी मुलगी तिच्या लग्नात खूप आनंदात होती. ती तिच्या पतीबरोबर देखील डीजेच्या तालावर नाचली. आम्ही दोन्ही कुटुंबातील व्यक्ती या लग्नामुळे खूप खुश होतो. मात्र माझ्या मुलीच्या मनात काय होते याची मला काहीच कल्पना नाही. तिने उचललेल्या या पावलामुळे आम्ही देखील खूप दुःखी आहोत.

 

वधू आणि वर दोन्ही कुटुंबातील सदस्य आता दुःखाच्या सागरात बुडाले आहेत. वधूने उचललेले हे पाऊल अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण करत आहे. तसेच अजूनही तिचा काहीच पत्ता न लागल्याने वेगवेगळ्या चर्चांना देखील उधान आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close