विराट कोहली ने कॅप्टन पद गमावलं; आत्ता संघामधील स्थान ही गमावणार?

मुंबई|विराट कोहली हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारताच्या राष्ट्रीय क्रिििकेट संघाचा माजी कर्णधार आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळतो.
तो अनेकदा त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो आणि काही समीक्षकांच्या मते तो इतिहासातील सर्वोत्तम मर्यादित षटकांच्या फलंदाजांपैकी एक आहे. 2013 ते 2022 दरम्यान, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 213 सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. 68 कसोटी सामन्यांपैकी 40 विजयांसह कोहली हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
पण मागील काही दिवसांपासून विराटच्या आयुश्यात काही गोष्टी बरोबर घडत नसतानाच दिसात आहे. भारतीय संघाचे कॉप्तन पद सोडणे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे पण कॅप्टनपद सोडले आहे. तेव्हा पासून त्यांचा फॉर्म पण गायब झाला आहे.
Tata IPL 2022 मध्ये खेळत असताना तो दोन वेळेस शून्य वर बाद झाला IPL 2022 मधील नऊ सामन्यांनंतर, त्याच्या नावावर 119.62 च्या स्ट्राइक-रेटने एकूण 128 धावा आहेत. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवात कोहलीची सर्वात कमी धावसंख्या आली.
त्यानंतर ‘BCCI’ मध्ये चर्चेला उधाण आलं आहे दिग्गज खेळाडूंची ‘IPL 2022’ ची कामगिरी बघून भारतीय संघात फेरबदल करण्याचा विचारात आहे या मध्ये विराट कोहली ला विश्रांती देण्याचा विचार केला जात आहे. रवि शास्त्री यांनी सुद्धा विराट कोहलीील हाच सल्ला दिल आहे की त्याने एक ते दोन महिने त्याने क्रिकेट पासून लांब राहााव ,या वर विराट कोहलीने कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही.