इतर
वांगी विविध कार्यकारी सोसायटीवर जय भवानी विकास पॅनलची एकहाती सत्ता

करमाळा | पूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेली वांगी बृहत् विविध कार्यकारी सोसायटी वर जय भवानी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. जय भवानी विकास पॅनल विरुद्ध नीलकंठ देशमुख अशी लढत पाहायला मिळाली, यात नीलकंठ देशमुख यांचा दारुण पराभव झाला आहे. यात जय भवानी विकास पॅनलचे 13 चे 13 उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
यात नितीन देशमुख, रविराज देशमुख, बबन गोडसे, नामदेव महाडिक, उमेश पाटील, विकास पाटील, दिनकर रोकडे, विजय रोकडे, नानासो भानवसे, आपासो भोसले, भैरवनाथ बंडगर, मंगल जाधव, साधना मंगवडे अशी विजयी झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. पुढील काळात विकास सोसायटीचा चांगल्या प्रकारे विकास करण्याचे वचन नूतन सदस्यांनी दिले आहे.