सुप्रसिद्ध रियल्स स्टार संतोष मुंडेंचा घातपात तर नाही ना, गावकऱ्यांचा संशय वाढला ….
Well-known reals star Santosh Munde is not killed, the suspicion of the villagers increased....

बीड: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कलाकार संतोष मुंडे आणि त्याचे सहकारी बाबुराव मुंडे यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.भोगेलवडी या गावात रात्रीच्या वेळी बाबुराव आणि संतोष हे डिपी वर फ्यूज बसवत होते. परंतु अचानक करंट आल्याने दोघांचाही मृत्यू जागेवरच झाला त्यामुळे तेथील नागरिकांसह इतर लोकांत ही संशयाचे वातावरण पसरले आहे.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त देखील होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार धारुर तालुक्यामध्ये असलेले भोगेलवाडी गावातील संतोष मुंडे आणि त्याचे सहकारी बाबुराव मुंडे हे भोगेळवडी ते कालवडी या रस्त्यावरचे फ्यूज बसवत होते. परंतु अचानक dp मध्ये करंट आल्याने दोघेही जागीच ठार झाले. झालेली घटना इतर लोकांना समजताच त्यांच्या मधून दुःख व्यक्त केले आहे. रीअसल मधून संतोष मुंडे ने प्रसिध्दी मिळवली होती. त्याने आपली स्वतःची वेगळच अस्तित्त्व निर्माण केलं होतं.
त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. अकाली निधनामुळे शोककळा पसरली आहे.या घटनेची नोंद धारुर पोलिसांनी करून घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.