कोण होते धर्मवीर आनंद दिघे साहेब; ज्यांचे पाय एकनाथ शिंदे यांनी धरले व नमस्कार केला

मुंबई | ९० च्या दशकात दिघे म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे दिघे असे समीकरण च जुळुन आले, धर्मावर आनंद चिंतामण दिघे शिवसेना पक्ष्याचे ज्येष्ठ नेते व शिवसेना पक्ष्याचे ठाणे जिल्हा प्रमुख होते. दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला. ठाण्यातला सर्वात गजबजलेला प्रसिद्ध म्हणून ओळख आसनाऱ्या टेंभीनाका परिसरात त्यांचे घर होते. या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा आयोजित केल्या जात होत्या.
तरुण वयात आनंद दिघे हे सभेला उपस्थित राहायचे. बाळासाहेबांचं व्यक्तिम्त्व व वक्तृत्व यांकडे बघून दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांच सुद्धा त्यांच्यावर प्रेम होत. दिघे यांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचा ठरवला आणि शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणुन कामं सुरु केलं.
एकनाथ शिंदे म्हणतात सुरवातीच्या काळात कुटुंबासोबत असताना खूप वाईट दिवस असायचे त्यातून धर्मविर आनंद दिघे साहेब यांनी सावरलं,मला धीर दिला आणि मला उभा राहण्याची टाकत धर्माविर आनंद दिघे साहेब यांनी दिली त्यांच्याबद्दल काय संगायची गरज नाही त्यांच्याकडे आपण दैवी महाशक्ती म्हणून पाहत होतो. बाळासाहेबांनी मला आशीर्वाद दिले आणि दिघे साहेबांनी मला प्रवाह मध्ये आणला त्यावेळेसचे त्यांचे शब्दं.
“आत्ता एकनाथ तुला बाहेर पडायचा तुला काम करायचा तुझ कुटुंब फार मोठे आहे तू मर्यादित कुठुंबाचा विचार करू नको समाजासाठी जगायचं, लोकांसाठी काम करायचेत ,लोकांच्या हिता साठी रबायचे. त्यांचा शब्दा मध्ये एवढी टाकत होती त्यांचा शब्दं कोण नाकारु शकतं.
दिघे साहेब मला कठीण कामं सांगायचे न होणारी काम मला सांगायचे कारण एकनाथ यामध्ये रंगला पाहिजे या मध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आन त्याचं ताकदीवर मी कठीण कामं करायची आणि म्हणायचो साहेब मी हे केलं… साहेब म्हणायचे एकनाथ तू हे केला झालं, हो साहेब झालं केला अजून नवीन काय करायचा. त्यावेळेस ठाणे महपालिकेचा मी सभागृह नेता परंतू ते मला मुरबाड ला जायला सांगायचे पालघर ला जायला सांगायचे त्यावेळी मी विचार करायचो मला इकडे का पटवतात काय त्यांच्या मनामध्ये होत.काय त्यांची दूरदृष्टी होती काय माहीत पण आज जो मी उभा तो फक्त न फक्त धर्मवीर आनंद चिंतामण दिघे साहेबतुमच्यामुळेच आहे” असा म्हणत एकनाथ शिंदेना अश्रू अनावर झाले.
हाच असणार आदर, श्रद्धा, आशीर्वाद अजून पण त्याच्या रूपातील कलाकार सुद्धा दिघे साहेब वाटतात; म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी वाकून पाय धरले व नमस्कार केला.