मनोरंजन

अद्भुत! पाकिस्तानी जवानांनी लावलेल्या गाण्यावर भारतीय जवानांनी देखील थिरकवले पाय से

मुंबई | भारत पाकिस्तान सीमेवरील आजवर तुम्ही अनेक तणावग्रस्त बातम्या ऐकल्या असतील. पाकिस्तानकडून आपल्या भारतीय सैन्यावर होत असलेले हल्ले, गोळीबार या सर्व घटना आणि बातम्या नेहमीच वाचायला मिळतात. मात्र भारत पाकिस्तानच्या याच सीमेवर एक अनोखा नजारा नागरिकांना दिसला आहे. सीमेवरील जवानांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसत असलेले दृश्य पाहून अनेक जण चकित झाले आहेत.

देशाचे संरक्षण करत असताना आपण एक भारतीय आहोत या भावनेने प्रत्येक सैनिक सीमेवर तैनात असतो. भारत आणि पाकिस्तान अशी ओळख मिळण्याआधी प्रत्येक व्यक्ती हा एक मानव असतो. त्यामुळे प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्या मनुष्याच्या भावना जाणतो आणि त्याचा आदरही करतो. याचीच प्रचिती भारत पाकिस्तान सीमेवर आलेली दिसली. काही दिवसांपूर्वी दिवंगत प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू सिंग मुसेवाला याचे निधन झाले. गोळ्या झाडून त्याची हत्या केली गेली. त्याच्या मारेकऱ्यांना देखील पोलिसांनी आता अटक केलेली आहे. सिद्धू आज जरी आपल्यामध्ये नसला तरी देखील त्याची गाणी नेहमीच त्याला अजरामर ठेवणार आहेत.

सिद्धू सिंग मूसेवालाच्या गाड्यांचे लाखो चाहते आहेत. त्याच्या गाण्यांची महती अगदी सीमे पलीकडे देखील पोहोचलेली आहे. भारत पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानचे काही सैनिक सिद्धू सिंग मुसेवालाचे एक गाणे रेडिओवर लावून मस्त एन्जॉय करत होते. सिद्धूचे गाणे ऐकून भारताच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना देखील राहवले गेले नाही. तेदेखील समोरील सैनिकांना पाहून या गाण्यावर थीरकू लागले. या सर्वांचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता वायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान अशी ओळख मिळण्याआधी प्रत्येक व्यक्ती हा एक माणूस असतो याची प्रचिती येते.

 

अनेक जण या व्हिडिओला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. भारतीय पोलीस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की समोरील पाकिस्तानी सैनिक जिथे स्पीकरवर गाणे लावून नाचत आहेत तिथे पाकिस्तानचा झेंडा देखील फडकत आहे. सिद्धू सिंग मुसे वालाच्या ” बंबीहा बोले ” या गाण्याचा आनंद घेत दोन्ही सीमेवरील सैनिक नाचत आहेत. सदर व्हिडिओ भारत पाकिस्तान सीमेच्या एका सीमा चौकीवर शूट करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close