ज्या घोड्याला जीव लावला त्यानेच घात केला’ घोड्याच्या धडकेत जवान शहीद

आंबेगाव | आंबेगाव तालुक्यातील जवान सुधीर पंढरीनाथ थोरात हे शहीद झाले आहेत. त्यामुळे पंचक्रोशीत आणि देशात शोककळा पसरली आहे. एक मेहनती आणि देश सेवा करणारा जवान शहीद झाल्याने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. सुधीर हे सीमा सुरक्षा दलात काम करत होते.
देशसेवा करणे हे त्यांचे स्वप्न होते. मात्र घोड्याच्या धडकेत त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. ते घोड्याच्या एका स्पर्धेसाठी ग्वाल्हेर येथे गेले होते. त्यावेळी ते खाली पडले आणि घोड्याने त्यांना जोरात धडक दिली यात ते जागीच ठार झाले आहेत.
त्यांच्या जाण्याने पूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात तीन बहिणी, आई वडील भ, पत्नी आणि दोन वर्षाचा चिमुकला आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण पंचक्रोशीत शोक व्यक्त केला गेला आहे. त्यांच्यावर शासकीय इस्मात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.