मनोरंजन

बेभान होऊन नाचणाऱ्या या मुलींचा डान्स पाहून नाचण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू नाही शकणार….

मुंबई |कोणत्याही गोष्टीचा जास्त आनंद झाल्यास प्रत्येक व्यक्ती नाचून तो आनंद व्यक्त करत असतो. मग अगदी पास झाल्यावर किंवा आयुष्यातील खूप मोठा विजय मिळवल्यावर ढोल ताशांच्या आवाजात व्यक्ती नाचत असतात.संगीत आणि नृत्य यांची एक वेगळी परंपरा आहे. प्रत्येक व्यक्ती आनंदात असला की, बेभान होऊन नाचत असतो.

 

मग हा नाच करताना त्याला कशाचीच पर्वा नसते. आपल्या आयुष्यातील सर्व दुःख विसरून प्रत्येक व्यक्ती सुरांमध्ये तनाने आणि मनाने लग्न झालेला असतो. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी नत्याच्या अनोख्या कला असतात. ज्या वृद्ध व्यक्तींना नाचता येत नाही त्यापासून देखील आपले हात हलवत नाचत असतात. डान्स करण्याचा वेगळ्या वेगळ्या कला आहेत. नृत्य क्षेत्रात आज अनेक व्यक्ती मोठं नाव कमवत आहेत. यामध्ये हिप हॉप, कथ्थक, भरतनाट्यम, भांगडा, पंजाबी, कोळी, क्लासिकल, कपल, लावणी असे अनेक वेगवेगळे प्रकार येतात.

 

बऱ्याच व्यक्ती खूप सुंदर डान्स करतात. त्यांचा डान्स एकदा पाहिला की पाहतच राहावं असं वाटतं. नृत्यात कुशल असलेल्या अनेक व्यक्ती पुढे यामध्येच आपले करिअर बनवतात. अनेक व्यक्ती आता बेली डान्स देखील शिकत आहेत. यात विशेष म्हणजे डान्स करून अनेक व्यक्ती आपले वजन देखील कमी करत आहेत. त्या डान्स प्रकारचे नाव आहे झुंबा. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असते मात्र त्यांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो अशा व्यक्तींसाठी झूंबा खूप फायदेशीर आहे.

 

आजकाल अनेक व्यक्ती झुंबा जॉईन करतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक व्यक्ती फास्ट फूड जास्त खातात. त्यामुळे त्यांना अनेक आजार जडतात. शरीरावर अतिरिक्त चरबी वाढते. ही चरबी कमी करण्यासाठी बऱ्याच व्यक्ती अशा पद्धतीने झुंबा जॉईन करतात आणि आपल्या वजन कमी करतात.

 

अशात हे सर्व झालं मोठ्या आणि शिस्तीतल्या डान्स बद्दल मात्र वरात आणि हळदीत देखील सगळे जण धिनातल होऊन नाचत असतात. यामध्ये कोणत्याच मर्यादा आणि शिस्त या गोष्टींचा विचार केला जातं नाही. तसेच ज्याला अजिबात नाचता येत नाही त्या व्यक्ती देखील वरात आणि हळदीमध्ये मस्त नाचत असतात. वरात आणि हळदी यामधील डान्स कधी संपच नये असं प्रत्येकाला वाटतं. अनेक व्यक्ती एकट्या घरामध्ये देखील नाचतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी निळ्या रंगाची साडी नेसून नाचत आहे. तिचा हा धीनताल डान्स पाहून सगळेच वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. यासह हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील नाचावेसे वाटेल एवढे मात्र नक्की. या मुलीबरोबर व्हिडिओमध्ये अन्य काही मुली देखील दिसत आहेत. बाकीच्या मुलींनी देखील साडी नेसलेली आहे. कमरेवर पदर खोचक या सर्वजणी ताल धरत आहेत. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला या मुलींचा डान्स बद्दल काय वाटतं ते मला कमेंट मध्ये जरूर कळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close