झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका होणार कायमची बंद; कारण कळतच प्रेक्षक भारावले

मुंबई | मन उडू उडू झालं या प्रसिद्ध मालिकेत कमी शिकलेला परंतु इमानदार , इंद्र आणि बँकेत नोकरी करणारी हुशार परंतु तितकीच मायाळू दीपू यांच्यावर आधारित मालिका होती. या दोघांची हटके जोडी प्रचंड चर्चेत आली होती. तसेच मालिकेत गुरुजींच्या तीन मुली दाखविण्यात आल्या आहेत. दीपू, सानिका आणि शलाका अशा या तीन पोरींची नावे आहेत.
यामधील शालक ही फटकळ आणि कोणाशीही न पटवून घेणारी आहे. तर दिपू आणि सानिका यांच्यात खूप चांगलं केमिस्ट्री दाखविण्यात आलं होती. या दोघीही अतिशय समजुतदार आणि कठीण काळात ठाम पणे एक मेकीना खंबीर साथ देत होत्या. त्यामुळे मालिकेतील त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली.
छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मराठी सीरियल पआपल्या भेटीला येत आहेत. तर काही प्रसिद्ध मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. झी मराठीवरील खूप प्रसिध्द झालेली मालिका मन उडू उडू झालं आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. या मालिकेचा शेवटच्या भागाचं शूटिंग सुद्धा पार पडलं आहे. मात्र मालिका बंद होत असल्याने प्रेक्षक प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक जण सोशल मीडिया द्वारे आपली नाराजी व्यक्त करताणा पाहायला मिळत आहेत.
मन उडू उडू झालं ही सीरियल खूप कमी कालावधीत प्रेक्षकांच्या आवडीस आली होती. मालिके तील इंद्रा आणि दिपूची हटके जोडी मुळे प्रेक्षकांना फारच आवडत होती. ही भूमिका हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ने स्वीकारली होती सोबतच दीपू आणि शलाका या बहिणींचं केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपचं आवडली. ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणा वर येऊन पोहोचली आहे.
मात्र येत्या काही भागां मध्येच ही मालिका बंद होणार आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेणार असल्याचं वृत्त आहे.पण मालिका बंद होत असल्याची माहिती सोशल मीडियावर येताच चाहते प्रचंड नाराज झाले. सतत सोशल मीडियावर मालिका बंद न करण्याची मागणी केली जात आहे