कृषी अपडेट

Kapus BajarBhav : कापूस बाजारभाव संधर्भात मोठी अपडेट; 10,000 दर द्या.

Cottan crop rate information in Marathi

Kapus BajarBhav | नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूस या पिकाच्या बाजारभाव बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यावर नेहमीच कोणते ना कोणते संकट येत आहे.(कापुस पीक माहिती) (cottan Rate in maharashtra)

सुरुवातीला पावसाने.तर आता बाजार भावाने शेतकऱ्याची डोकेदुखी वाढली आहे. कापसाच्या भावात घट झाल्याने शेतकरी राजा हा चिंतित पडला आहे. कापसाला 10000 रू दर मिळावा अशी मागणी शेतकरी मित्र करत आहेत. (Kapus BajarBhav in Maharashtra)

कापूस उत्पादक शेतकरी सद्या खूपच चिंतेत आहेत. कारण बाजार पेठेत कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस बाजार पेठेत आणला आहे परंतु त्यांच्या मालाला समाधान पूर्वक असा भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांनी कापसाला 10000 रू अशी मागणी केली आहे. सध्या बाजारात कापसाला भाव 8000 रुपये पर्यंत जेमतेम मिळत आहे. 12 हजारांचा दर हा 8000 रुपये वर आला. (Kapus bajarbhav November 2022)

गेल्या दोन दिवसापूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला भाव 12000 रुपये मिळाला होता. तर आज तो एकदम 4000 रुपये कमी झालेला दिसून येत आहे. अचानक असे भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. कापसाला कमीतकमी 10000 रुपये पर्यंत भाव मिळावा अशी त्यांची आशा आहे. (Kapus bajarbhav)

सर्वाधिक कापूस उत्पादन हे धुळे जिल्ह्यात होत आहे. कापसाचा सिझन हा नवरात्री पासून सुरू झाला. त्यावेळी कापसाला 12510 रू भाव देऊन सुरुवात करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसात  ओला कापूस असल्याच्या कारणावरून भाव कमी करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांत नारजी निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *