क्रिकेट विश्वात खळबळ; क्रिकेटरला एका वर्षासाठी जेल

पंजाब | भारतीय क्रिकेट टीमचे माजी फलंदाज व काँग्रेस पक्षाचे नेते नवज्योत सिंग सिद्धू (navjot sing Sidhu) यांना एका वर्षासाठी जेल मध्ये जावं लागणार आहे. रोड रेज खटल्यात मा. कोर्टाचा निर्णय समोर आला आहे. तसा बघायला गेले तर ही गोष्ट ३४ वर्ष जुनी आहे. २७ डिसेंबर १९८८ पटियाला मध्ये ही भांडणे झाली होती. ही भांडणे पार्किंग साठी झाली होती.
रस्त्यावरून पीडित व्यक्ती बँक मध्ये चालली होती तेव्हा सिद्धू ने त्यांना बाजूला होण्यासाठी सांगितले त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांचा म्हणणे होते की त्या पीडित तरूण वक्ती बरोबर सिद्धू ने मारहाण केली व त्या ठिकाणावरून फरार झाला. मारहाण झाल्या नंतर पीडित तरूण व्यक्तीला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
त्या वेळेस स्टार खेळाडू म्हणून ओळख असणाऱ्या सिद्धूला कोर्टाने गुन्हेगार घोषित करून एक वर्षासाठी जेल ही शिक्षा सुनावली आहे. त्यावेळेस सिद्धू हे २५ वर्षाचे होते व जाच्या सोबत मारहाण झाली त्यांचं वय 65 वर्ष होता. त्यांचा नाव गुरणाम सिंग होते. डॉक्टरांनी त्यांना डोक्यात जखम झाल्या मुळे मृत्यु झाल्याचं सांगितलं.
त्यानंतर कोर्टाने सिद्धूला तीन वर्षासाठी शिक्षा सुनावली होती पण नवज्योत सिंग सिद्धू ने सुप्रीम कोर्टात याचिका सादर केली. कोर्टाने मारहाण केल्याच्या आरोपाखाली एक हजार रुपये दंड केला. परत पीडित व्यक्तीच्या कुठुंबनी पुनर्विचार याचिका दाखल केली. कोर्टाने विचार बदलून परत सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.