क्रीडामनोरंजन

आणखीन एक क्रिकेटर अडकला अभिनेत्रीच्या प्रेमात, अभिनेत्री सध्या गाजवत आहे साउथ इंडस्ट्री….

रांची| अभिनय विश्व आणि क्रिकेट या दोघांचं एक वेगळं असं नातं राहिलं आहे. आजवर अनेक बॉलीवूड अभिनेत्री क्रिकेटरच्या प्रेमात पडलेल्या आहेत. सोशल मीडियावर यांच्या प्रेमाच्या चर्चा देखील झाल्या आहेत तसेच या क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींनी लग्न देखील केलेलं आहे.

 

नवाब पतोडी आणि शर्मिला टागोर या दोघांपासून बॉलीवूड आणि क्रिकेटचं नातं जोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता अगदी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे देखील एकमेकांच्या प्रेमात पडून विवाहबद्ध झाले. बॉलीवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सच्या प्रेमाचा खुलासा अनेक वेळा आयपीएलच्या सामन्यांमध्ये झाला आहे. अनेक अभिनेत्री आपल्या आवडत्या खेळाडूला आणि प्रियकरायला खेळात प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये येत असतात. तिथूनच मग पुढे खेळाडू आणि अभिनेत्री यांच्या प्रेमाची कथा चर्चेत येते.

 

वर्षानुवर्षे चालत असलेल्या क्रिकेट हा खेळ आता अधिकच लोकप्रिय ठरत चालला आहे. खेळ पाहण्यासाठी चाहते स्टेडियम मध्ये नेहमीच गर्दी करतात. आयपीएलचे खेळ हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभर पसरलेले आहेत. त्यामुळे इथेच जोडल्या जाणाऱ्या जोड्या या संपूर्ण जगभर प्रसिद्ध होतात आणि चर्चेचा विषय ठरतात.

 

क्रिकेट पाहताना मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. कारण कधी कोणी सिक्स मारेल तर कधी कुणाची विकेट पडेल याविषयी कुणालाच काही माहिती नसते. अगदी एका सस्पेन्सफुल चित्रपटाप्रमाणे क्रिकेटचा सामना रंगलेला असतो. हा सामना बघण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. स्टेडियम बरोबरच प्रत्येक चौका चौकात प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक घराघरात आयपीएलचे सामने टक लावून पाहिले जातात. यात आपली टीम जिंकल्यावर असणारा आनंद काही वेगळाच असतो.

 

अशात अभिनय क्षेत्र आणि क्रिकेट हे पुन्हा एकदा एकत्र येत असल्याचे दिसत आहे. केकेआरचा सलाम वीर आणि प्रसिद्ध खेळाडू व्यंकटेश अय्यरचे नाव एका अभिनेत्री बरोबर जोडले जात आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री बॉलीवूडमधील नसून ती आपल्या महाराष्ट्रातील आहे. मात्र ती सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत आहे. व्यंकटेश बरोबर जोडल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचे नाव प्रियंका जवळकर आहे. आतापर्यंत तिने मल्याळम सिनेसृष्टीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत.

 

गरम आये या चित्रपटामधून तिने मल्याळम सेनेसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर तिने अभिनेता विजय देवरकोंडा बरोबर टॅक्सीवाली हा चित्रपट केला. या चित्रपटाने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच तिची मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली.

 

प्रियंका आणि व्यंकटेश हे दोघे देखील एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात. हे दोघेही नेहमीच इंस्टाग्राम वरती शेअर केलेल्या पोस्टला एकमेकांना कमेंट करत असतात. नुकताचे अभिनेत्रीने आपला एक सुंदर फोटो शेअर केला होता. यावर व्यंकटेशने कमेंट करत लिहिलं होतं की, “क्युट” त्यावर अभिनेत्रीने त्याला रिप्लाय करत लिहिलं की, ” कोण? तू…..? ” या दोघांचा हा प्रेमळ संवाद आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा देखील सुरू आहे.

 

प्रियंका ही एका मराठी कुटुंबातली असली तरी तिचा जन्म आंध्रप्रदेश येथे झाला आहे. तिथेच ती लहानाची मोठी झाली. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. प्रियंका खरोखरच खूप क्युट दिसते. तिच्या चेहऱ्यावरील सुंदरता पाहून आता व्यंकटेश देखील घायाळ झालेला आहे. असं अनेक चाहते त्यांना कमेंट करत म्हणत आहेत. तसेच हे दोघे एकत्र आल्यास दोघांचेही चाहते खूप खूप होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close