मनोरंजन

बोल्ड आणि हॉट सिन्सचा पुन्हा एकदा मोठा कहर, मर्डर चित्रपटाचा रिमेक येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…..

बॉलीवुड म्हणजे ड्रामा आणि ॲक्शनचा बोलबाला ही संकल्पना आता बदलली आहे. बॉलीवुडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये फक्त ॲक्शन आणि ड्रामाच नाही तर, बोल्ड आणि हॉट सीनचा देखील भडीमार पाहायला मिळतो आहे. गँग ऑफ वासेपूर याचंच एक उत्तम उदाहरण आहे. अशात ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यापासून बॉलीवूड चित्रपटांमध्ये बोल्ड सीन अधिक पाहायला मिळत आहेत.

साल २००४ मध्ये मर्डर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने तरुणाईला पूर्णतः वेड लावले होते. आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. किस आणि मादक अदांचा यात नुसता पाऊस पडलेला दिसला. या चित्रपटानंतर इम्रान हाश्मीला सिरियल किसर हा टॅग देखील पडला.

कारण नंतर त्याने जेव्हढे काही चित्रपट केले त्या सर्व चित्रपटांमध्ये लाँग आणि डीप किस सीन आवर्जून पाहायला मिळाले. मात्र मल्लिका ‘हिस्स’ या चित्रपटानंतर अभिनयापासून दूर गेली. अशात आता ती पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत आहे. लवकरच ती राज कपूर यांच्या RK/ RKAY या आगामी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा एक टिझर समोर आला आहे. अशात मल्लिका या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनला लागली आहे.

प्रमोशन करत असताना अनेक वेळा तिचा माध्यमांशी संबंध येत आहे. अशात नुकतीच ती माध्यमांसमोर आली होती. त्यावेळी तिने मर्डर या चित्रपटात संदर्भात एक खुलासा केला. यावेळी तिला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, मर्डर या चित्रपटाचा रीमेकी येणार आहे का? उत्तर देत ती म्हणाली की, ” चाहत्यांना आपलं काम पाहचंय असतं मग ते रिमेकच्या मार्गाने असो वा आणखी काही. मी यापुढे ओटीटीवर अनेक सिनेमे करते आहे. यापुढे मी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात राहणार आहे. त्यामुळे तसेच चित्रपट मी करेन आणि त्यांच्या रिमेकमध्ये मला काम करायला आवडेल.” असं ती म्हणाली. यावर पुन्हा एकदा ‘मर्डर’च्या रिमेकमध्ये तू काम करणार का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली, ”चांगली स्क्रिप्ट माझ्याकडे आली तर चित्रपटात काम करण्यास मी इच्छुक असेन. ” तिच्या या वक्तव्याने मर्डरचा रिमिक्स येणार असं म्हणत आहेत.

बॉलीवुडमध्ये सतत दाखवण्यात येणारे हॉट आणि बोल्ड सीन्स पाहून अनेक व्यक्ती यावर टीका करतात. काहींनी तर बॉलीवूडला पॉर्न इंडस्ट्री असं देखील म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी अनेक व्यक्ती हे चित्रपट मनोरंजनाचा एक भाग म्हणून आवडीने पाहतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close