मनोरंजन

फोटोत दिसणार चिमुकला गाजवतो आहे बॉलिवूड, ओळख पाहू हा आहे तरी कोण?

बॉलीवूड मधील सर्वच कलाकार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहतात. आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या आवडीचा कलाकार हा लहानपणी कसा दिसायचा तो कोणत्या शाळेत शिकत होता इथपासून सर्व माहिती चाहत्यांना माहित करून घ्यावीशी वाटते.

अशाच सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलाचा फोटो तुफान वायरल होत आहे. हा मुलगा आपले दोन्ही हात वर करून आनंदात नाचताना दिसतो आहे. अनेक जण सोशल मीडिया वरती एकमेकांना चॅलेंज देत आहेत. हा फोटो कुणाचा आहे हे ओळखण्यात खूप कमी जण यशस्वी ठरले आहेत. अशात तुम्हाला देखील हा फोटो नेमका कोणत्या अभिनेत्याचा आहे हे समजले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा फोटो बॉलीवूडच्या खिलजीचा आहे.

होय फोटोमध्ये दिसत असलेला हा चिमुकला रणवीर सिंग आहे. रणवीरने आजवर बॉलीवूडमध्ये मोठं नाव कमावलं आहे. मात्र सुरुवातीच्या काळात तो एका ठिकाणी कॉपीरायटर म्हणून काम करत होता. त्याने देखील सुरुवातीला अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन दिले होते. त्यावेळी बँड बाजा बारात या चित्रपटासाठी त्याचं सिलेक्शन झालं. अनुष्का शर्मा बरोबर त्याने सर्वप्रथम स्क्रीन शेअर केली होती. त्याच्या पहिल्याच चित्रपटातून तो यशाच्या शिखरावर पोहोचला.

त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. अशाच साल 2018 मध्ये त्याने अभिनेत्री दीपिका पदुकोण बरोबर विवाह केला. रामलीला, पद्मावत अशा अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले आहे. रणवीर सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. जयेश भाई जोरात या चित्रपटामध्ये तो अखेरचा झळकलेला दिसला. या चित्रपटामध्ये देखील त्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले.

सर्कस आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. सध्या तो याच चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच त्याने एका मॅक्झिनसाठी न्यूड फोटशूट केले. ज्यामुळे तो मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एक ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close