बॉलिवूड हादरलं! दिग्गज गायिकेचे निधन; चित्रपट सृष्टीवर शोककळा

दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे. अनेकजण जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल व्यक्त केला जात आहे.
गायन क्षेत्रातील मान्यवर अवघ्या काही दिवसात आपल्या तून निघून गेले आहेत. यात लता मंगेशकर, बप्पी लहरी, केके, सिद्धू मुसेवाला या सारखे अनेक दिग्गज कलाकार या जगात सध्या राहिले नाहीत. त्यामुळे संगित क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना?
असा सवाल व्यक्त केला जात आहे. संगीत सोबत अभिनय क्षेत्रातील मान्यवर देखील जगाचा निरोप घेत आहेत. अनेकांनी या जगाला कायमचा निरोप ठोकल्यामुळे शोक व्यक्त केला जात होता. वरील बातम्या ताज्या असताना आणखी एका दिग्गज गायिकेने जगाचा निरोप घेतला आहे.
नय्यारा नुर असे या गायिकेचे नाव आहे. त्या ७१ वर्षाच्या होत्या. त्यांनी पाकिस्तानी कला विश्वात अनेक गाणी गाऊन करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होत. त्यांची सर्व पार्श्वभूमी ही भारतातील आहे. नूर यांचा जन्म भारत देशात झाला. त्यांचा जन्म १९५० रोजी आसाम मधील गुवाहाटी मध्ये झाला.
त्यांचे वडील हे प्रसिध्द व्यापारी होते. मात्र ते मुस्लिम लीगशी संबंधित होते. काही कालावधीनंतर त्यांनी पाकिस्तान मध्ये जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि ते कुटुंबाच्या समवेत पाकिस्तान मध्ये जाऊन राहिले. त्यामुळे नूर यांना देखील पाकिस्तान मध्ये जावून राहावे लागले आहे.
त्यांच्या निधनाच्या बातमीने पाकिस्तान सोबत इतर देशातील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी गायलेली अनेक गाणी चाहत्यांच्या स्मरणात राहिली आहेत.