सिनेसृष्टी हादरली! प्रसिध्द विलनचे दुःखद निध

सिनेविश्वातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सलीम घौस यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने सलीम यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ७० व्या वर्षी सलीम यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी (२८ एप्रिल) रोजी सकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सलीम यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
सलीम यांनी आजवर अभिनय क्षेत्रात खूप कामे केली आहेत. त्यांच्या अभिनयाचा डंका संपूर्ण जगात वाजलेला आहे. आजवर त्यांनी हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले. चित्रपटांसोबतच सलीम घौस यांनी टीव्ही शोमध्येही आपला हरहुन्नरी अभिनय दाखवला आहे. त्याचबरोबर त्यांनी थिएटरमध्ये केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले. सलीम घौस हे श्याम बेनेगल यांचा टीव्ही शो “भारत एक खोज” मध्ये देखील झळकले होते. त्यांच्या सर्वोत्तम कामांपैकी या शोमधील काम देखील एक आहे. त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टी दणाणून सोडली होती.
त्यांच्या निधना नंतर विवान शाहपासून शारीब हाश्मीपर्यंत सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर सलीम घोष यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साल 2009 मध्ये “वेल डन अब्बा” या चित्रपटाला देखील त्यांच्या अभिनयाने खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात बोमन इराणी, रवी किशन आणि मनीषा लांबा देखील दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी सलीम ‘का – द फॉरेस्ट’ या तमिळ चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज होणार होते. मात्र ‘वेल डन अब्बा’ हाच त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला. आज ते आपल्यामध्ये नसले तरी अनेक व्यक्ती आजही आवडीने त्यांचे चित्रपट पाहतात.